• Home
  • Gossip
  • director Love Ranjan. does not getting new heroine for his upcoming movie, Actor Ajay and Ranbir are also busy in their other movies

Bollywood / दिग्दर्शक लव्ह रंजनला मिळत नाहीये आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री, अजय आणि रणबीरदेखील चित्रपटात व्यस्त आहेत 

फॅन्सच्या रिक्वेस्टवर दीपिकाने सोडला चित्रपट

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 02:59:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : दीपिका पादुकोणने अशातच लव्ह रंजनच्या एका चित्रपटापासून स्वतःला वेगळे केले. लव्ह रंजनवर मीटू अंतर्गत सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला आहे. अभिनेत्रीने नकार दिल्यांनतर हा चित्रपट काही काळासाठी टाळला गेला आहे.

अभिनेत्रीचा शोध सुरु आहे...
लव्हच्या या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा भाग रणबीर कपूर आणि अजय देवगण आहे. चित्रपटाच्या लीड अभिनेत्रीबद्दल आता पुन्हा एकदा शोध सुरु झाला होता. याचदरम्यान रणबीर कपूर अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमध्ये व्यस्त झाला आहे. तर अजयदेखील आपला होम प्रोडक्शनचा चित्रपट 'बनाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये व्यस्त आहे. दोन्ही स्टार्सच्या व्यस्त शेड्यूल आणि लीड अभिनेत्रीचा शोध सुरु असल्यामुळे शूटिंग टाळले जात आहे.

फॅन्सच्या रिक्वेस्टवर दीपिकाने सोडला चित्रपट...
जेव्हा हि बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती की, दीपिका लव्हच्या चित्रपटाचा भाग बनणार नाही. तेव्हा तिच्या फॅन्सने #NotMyDeepika असे एक कॅम्पेन चालवले होते. या कॅम्पेनद्वारे तिच्या फॅन्सने तिला सेक्शुअल हरॅसमेंट्च्या आरोपीसोबत काम न करण्याचे अपील केले होते. दीपिकाने आपल्या फॅन्सचे म्हणणे मानून या चित्रपटातून आपले हात काढून घेतले.

X
COMMENT