आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, आणि अभिनेता अरबाज शेख यांनी आपल्या मूळगावी येऊन मतदानाचा हक्क बजावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मतदान केले. - Divya Marathi
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मतदान केले.

गणेश जगताप

करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी मतदानासाठी मूळचे जेऊर ता करमाळा येथील असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, बालाजी मंजुळे(आयएएस) व  चित्रपट कलाकार अरबाज शेख यांनी मतदानासाठी आवर्जून आपल्या कुटुंब व मित्रपरिवार सहित येऊन मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

नागराज मंजुळे हे प्रत्येक निवडणुकीत गावाकडे येऊन आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावत असतात. आगामी त्यांच्या झुंड चित्रपटाचे कामकाज सुरू असतानाही त्यांनी गावाकडे येऊन मतदान केले. मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आहे सर्वांनी मतदान करावे असे मतदारांना त्यांनी आवाहन केले.

तसेच नियोजन विभागात सचिवपदी असलेले बालाजी मंजुळे यांनीही गावी येऊन आवर्जून मतदान केले. याआगोदरच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेले आहे. परंतु यावेळेस त्या प्रक्रियेत नसल्याने त्यांनी गावी येऊन मतदान केले आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर सैराट मधीलच सल्ल्या उर्फ अरबाज शेख यानेही पहिल्यादांच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या मित्रांसोबत येऊन त्याने मतदानाचे कर्तव्य बजावले. मागील लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये मतदानासाठी नावनोंदणी करूनही त्याचे मतदान यादीत नाव आले नव्हते. त्यामुळे तो मतदानापासून वंचित राहिलेला होता. तर मतदानासाठी पुन्हा अर्ज केल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान यादीत त्याचे नाव आले. त्यामुळे त्याने आपल्या गावी येऊन मतदान केले. मतदान करून आनंद वाटला तर लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे गरजचे असल्याचे त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...