आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने दिली गॅरंटी, मल्टीस्टारर 'चोरीचा मामला' बघताना तुम्ही होणार नाही बोअर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित "चोरीचा मामला" या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अमृता खाननिलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी तगडी स्टारकास्ट असून,  लियो नावाच्या एका कुत्र्याची भूमिका देखील आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  


एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.  प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. प्रियदर्शनने चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन 'एकामागे एक आले किती चोर, गॅरंटी देणार, तुम्ही होणार नाही बोअर!', हे कॅप्शन दिले आहे. 

चित्रपटाच्या पोस्टरमधूनच चित्रपट धमाल आणि मनोरंजक असल्याचं आपल्याला कळतं. चित्रपटातील व्यक्तिरेखा अर्कचित्राद्वारे मांडण्यात आल्या आहेत. एक चोरी, त्यात होणारा गोंधळ आणि वाढत जाणारा गुंता असं चित्रपटाचं कथासूत्र आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. पोस्टर लाँचपूर्वी चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे टीजर रिलीज करण्यात आले होते.  

अनिकेत विश्वासरावने चित्रपटात पोलिसाची भूमिका वठवली आहे. 

क्षिता जोग अंजली पाटील म्हणजेच पाटलीणबाईच्या भूमिकेत आहे.

तर हेमंत ढोमे अमरजीतदादा पाटील या व्यक्तिरेखेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर हिचीदेखील महत्त्वाची भूमिका या चित्रपटात असून श्रद्धा हे तिच्या पात्राचे नाव आहे. 

अभिनेता जितेंद्र जोशी नंदनच्या भूमिकेत आहे. 

अभिनत्री किर्ती पेंढारकरने आशा ही व्यक्तिरेखा साकारली आहे.