आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणींसाठी रोहित शेट्टीला सोडावे लागले होते शिक्षण, पहिल्या चित्रपटानंतर कुणीही सोबत काम करायला नव्हते तयार, मग रोहित असा बनला बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर रोहित शेट्टीचा चित्रपट 'सिम्बा' 28 डिसेंबरला रिलीज होत आहे. रोहित शेट्‌टी फेमस स्टंटमॅन आणि व्हिलन एमबी शेट्‌टीचा मुलगा आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर रोहितला लहानपणी खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी तो टीनएजर होता. तो कॉलेजही पूर्ण करू सकाळ नाही. फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. कारण त्यांच्याकडे पैशांची छानछान जाणवू लागली होती. 

 

35 रुपये होती रोहित शेट्टीची पहिली कमाई...
संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना रोहित एका मुलाखतीत म्हणाला होता, "जेव्हा मी काम सुरु केले तेव्हा घर चालवण्यासाठी पिसे कमवायचे होते. कॉलेजसोडले कारण मला माहित होते कि कपड्यांसाठी आणि पुस्तकांसाठी पैसे कुठून येणार. मला ठाऊक नव्हतेब हे सर्व कोण करेल. त्यामुळे मी काम करणे आणि पैसे कमावणे सुरु केले. माझ्या लक्षात आहे माझी पहिली कमाई ३५ रुपये होती." रोहित पुढे म्हणाला, "मी नशिबवान आहे असे माझ्या मोठ्या बहिणी म्हणतात. असे आयुष्य मिळणे अवघड आहे. मी असे म्हणत नाही की मी महान आहे. माझे चित्रपट लोकांना भावतात म्हणून प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात. मला आजपयंत नाही कळले कि प्रेक्षक माझ्यावर इतका का जीव लावतात. हे जादूसारखे आहे. मला फॅन्स आणि मीडियाकडून खूप प्रेम मिळाले आहे."

 

तब्बूच्या साडीला केले प्रेस, काजोलचे स्पॉटबॉयही होते.. 
बॉलिवूडमध्ये अक्शन आणि कॉमेडीला एकत्र स्क्रीनवर दाखवण्यात एक्सपर्ट असलेल्या रोहितने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याला या उंचीवर पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागली होती. त्याने सांगितले की तो 1995 मध्ये आलेला चित्रपट 'हकीकत' ची अभिनेत्री तब्बूच्या साड्यांना प्रेस करत होते. एवढेच नाही तो काजोलचा स्पॉटबॉयदेखील होता. 

 

असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली करियरची शुरुआत... 
रोहितने 17 व्या वर्षी असिस्टंट डायरेक्टर म्हणून चित्रपट 'फूल और कांटे' पासून आपले करियर सुरु केले होते. त्याने 30 वर्षाचा असताना पहिला चित्रपट  'जमीन' (2003) हा डायरेक्ट केला, ज्याने काही खास कमाल नाही केली. यांनतर त्याच्यासोबत कुणी काम करायलादेखील तयार नव्हते. पण त्याने धीर सोडला नाही. नंतर अजय देवगनने त्याची साथ दिली. आज रोहित जे चित्रपट बनवतो. ते 100 कोटींच्या क्लबमध्ये आरामशीर पोहोचते. रोहितने 2006 मध्ये चित्रपट 'गोलमालः फन अनलिमिटेड' बनवला. आत्तापर्यंत 'गोलमाल' सीरीजचे 4 चित्रपट बनले आहेत आणि चारीही बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. रोहितने अजय देवगनसोबत 10 चित्रपट बनवले. यामध्ये 'फूल और कांटे', 'गोलमाल', 'संडे', 'गोलमाल रिटर्न', 'ऑल द बेस्टः फन बिगिन्स', 'गोलमाल 3', 'सिंघम', 'बोल बच्चन', 'सिंघम रिटर्न', 'गोलमाल अगेन' असे चित्रपट आहेत. रोहितचा अपकमिंग चित्रपट 'सिंबा' मधेही अजय देवगन दिसणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...