• Home
  • Gossip
  • Director Siddhartha praises Tiger for 'War' film, saying '2:30 minute action scene he completed in one shot'

बॉलिवूड / 'वॉर' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थने केले टायगरचे कौतुक, म्हणाला - '2:30 मिनिटांचा अॅक्शन सीन एका शॉटमध्ये पूर्ण केला' 

इतर चित्रपटांच्या तुलनेत 'वॉर'मध्ये वेगळा असेल टायगरचा अँग्री लुक

दिव्य मराठी वेब

Sep 16,2019 10:37:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन-टायगर श्रॉफ यांचा आगामी अॅक्शन चित्रपट 'वॉर' 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने अॅक्शन सीन्ससाठी टायगरचे कौतुक केले काही. तो म्हणाला की, 2.30 मिनिटांचा हेव्ही फाइट सीक्वेंस टायगरने एका शॉटमध्ये पूर्ण केला. हा शॉट एकही कट विना शूट केला गेला.


वेगळाच असेल टायगरचा अँग्री लुक...
हा अॅक्शन सीन सी यॉन्ग ओह याने विशेषतः टायगरसाठी कोरियोग्राफ केला होता. आनंदने पुढे सांगितले, सीनमध्ये जेव्हा टायगर सेनेच्या लोकांना आपल्या हाताने मारताना दिसणार आहे, तेव्हा तो वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहे. जेव्हा गोष्ट अॅक्शनची येते, तेव्हा देशात टायगरपेक्षा उत्तम कुणीही नाही.


टायगर नसता तर 'वॉर' चित्रपट झाला नसता...
यापूर्वीही आनंदने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जर टायगर या चित्रपटात नसता तर हा चित्रपट बनवणे अवघड झाले असते. मी चित्रपट बंद केला असता. किंवा काहीतरी दुसरे लिहिले असते, ज्यामध्ये टायगर असता. चित्रपटात ऋतिक स्पेशल एजंट बनलेला आहे, तर टायगर खालिदची भूमिका साकारत आहे, ज्याचे काम ऋतिक म्हणजेच कबीरला थांबवणे आहे.

X
COMMENT