आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार, चित्रपटाचे नाव आहे 'पावन खिंड'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  मराठीतील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि बॉलिवूडमधील 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', 'पानिपत: द ग्रेट बेट्रेयल' या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता आणखी एक ऐतिहासिकपट मोठ्या पडद्यावर येतोय. पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडलेले शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव 'पावन खिंड' असे आहे. बाजी प्रभू देशपांडे हे मराठा साम्राज्याचे एक शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

 डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 

" ...तोफे आधी, न मरे बाजी सांगा मृत्यूला." ही कथा आहे, बाजी प्रभू देशपांडेंची - आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरू झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सूर्याला - वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची. आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर नंतर सादर करीत आहोत कथा त्या एका रात्रीची, जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला. दीपावलीच्या जल्लोषात, पराक्रम आणि बलिदानाच्या त्या रात्रीचं स्मरण ठेवूया. दिवाळी 2020, वीरश्रीची अमर कहाणी…पावनखिंड' दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चित्रपटाचील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवली आहेत. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा ऐतिहासिकपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...