आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉयलेटच्या पाण्याने बनते ट्रेनच्या पँट्रीकारमध्ये अन्न, घाण जागेत ठेवल्या जातात भाज्या, RO देखील नाही चालत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा(राजस्थान)- रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांपूर्वी निजामुद्दीन-कोटा जनशताब्दी एक्सप्रेसने श्रीमहावीरजी येथे आले होते. त्यावेळेस वल्लभगढच्या आसपास ट्रेनच्या मिनी पँट्रीने त्यांना थंड अन्न दिले होते, त्यावर त्यांनी नाराज होऊन गुत्तेदाराला 1 लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर भास्करने कोटावरून निघणारी लांबच्या प्रवासाच्या दोन ट्रेन अमृतसर-मुंबई स्वर्ण मंदिर मेल आणि बांद्रा-मुजफ्फरपुर अवध एक्सप्रेसच्या पँट्रीकारला चेक केले. दोन्ही ट्रेनमध्ये घाण पाण्यापासून अन्न बनवले जाऊ लागले. त्याशिवाय घाण जागेत खाण्याचे सामान ठेवले होते. 


गोयल यांना खराब हॉटकेसमुळे मिळाले होते थंड जेवण
कोटा-निजामुद्दीन-कोटा जनशताब्दी ट्रेनच्या एसी आणि नॉन एसी कोचमध्ये मिनी पँट्रीकार साठी गुत्तेदाराने हॉट केस, बॉयलर व फ्रिजर लावले आहेत पण ते खराब आहेत. रेल्वे मंत्र्यांना पँट्रीचे जेवण थंड मिळाले होते, त्यानंतच ते अक्शनमध्ये आले आणि त्यांनी पँट्रीकार संचालक फर्म दून केटरर्सच्या मॅनेजरला याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की, ट्रेनच्या 9 कोचमध्ये लागलेले सगळे उपकरणे खराब आहेत. या बद्दल आयआरसीटीसी आणि रेल्वे आधिकाऱ्यांना सांगितलेले आहेत.


खराब होते आरओ, घाण पाइपमधून घेतले जात होते पाणी
अमृतसर वरून मुंबईला जाणारी स्वर्ण मंदिर मेल शुक्रवारी कोटाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर ठरलेल्या वेळेपेक्षा 1 तास 20 मिनीट उशीरा पोहचली. त्यानंतर भास्करटे रिपोर्टर आणि फोटो जर्नलिस्ट पँट्रीकारमध्ये गेले तेव्हा कर्मचारी रेल्वे लाइनच्या जवळच्या पाइपलाइनमधून 2 ड्रम पाणी भरत होते. त्या पाइपलाइमधून ट्रेनच्या संडासमध्ये पाणी भरले जाते. त्याशिवाय पॅंट्रीकारमध्ये खराब भाजीपाला ठेवला होता. फोटो काढला तर पँट्री मॅनेजर देवेन्द्र सिंगने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रिपोर्टरने आरओच्या पाण्यापासून अन्न का बनवत नाहीत असा प्रश्न विचारल्यावर, त्याच पाण्याने बनवले जाते असे उत्तर त्याने दिले. त्यानंतर आराओ चेक केल्यावर पाहिले तेव्हा ते चाललेच नाही. इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आरओला जोडलेल्या पाण्याच्या टाकीची पाइपलाइन खराब झाली आहे.


घाण जागेत ठेवलेला होता भाजीपाला
स्वर्ण मंदिर मेलमधली स्थिती पाहिल्यानंतर भास्करची टीम बांद्रा ते मुजफ्फरपुर जाणाऱ्या अवध एक्सप्रेसच्या पँट्रीकारमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यातही खराब पाणी होते. पँट्रकारचे कर्मचारी घाण पाणी भरत होते तर सगळा भाजीपाला खराब जागेवर ठेवलेला होते. पँट्रीकारचे मॅनेजर हरिओम शर्माने सांगितले की, चांगल्या पाण्याने अन्न बनवले जाते पण त्याठिकाणची परिस्थीती पाहून तसे दिसत तर नव्हते. 


सुपरव्हायजर करत नाहीत चौकशी
जिथून ट्रेनची सुरूवात होते तेथे आयआरसीटीसीचा सुपरव्हायजर चालतो. ते सगळ्या अन्नाच्या सामानावर लक्ष ठेवतात, पण बहुतेक सुपरव्हायजर पहिल्या स्टेशनवरच पॅट्रीकार कर्मचाऱ्यांचे मेडिकल कार्ड चेक रून रजिस्टरवर साइन करून आपली रिपोर्ट आयआरसीटीसीला पाठवतात. या त्यांच्या कामचुकारपणामुळेच रेल्वेत घाण अन्न बनते.


मागच्या वर्षी आल्या होत्या 7500 तक्रारी
रेल्वे मंत्रालयाला मागच्या वर्षी खराब अन्नासाठी 7500 तक्रारी आल्या होत्या आणि त्यासाठी रेल्वेने गुत्तेदारांवर 1.5 कोटींचे दंडदेखील लावला होता. सध्या दररोज 1100 तक्रारी येत असतात.


हेल्पलाइन - टोल फ्री नंबरवर करू शकता तक्रार
ट्रेनने प्रवास करताना चांगले अन्न दिले नाही तर तुम्ही रेल्वे टोल फ्री नंबर 1800111321 वर तक्रार करू शकता, त्याशिवाय 9711111139 वर एसएमएस पाठवू शकता किंवा रेल्वेचे ट्विटर हँडल @IRCTCofficial तक्रार नोंदवू शकता.