आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आयफोन 6 आणि 6Sची विक्री बंद, अनेक आयफोन स्टोअर्सना लागणार टाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली। अमेरिकेची फोन निर्माता कंपनी अॅपलने आयफोन 6 आणि आयफोन 6S तसेच आयफोन 6S प्लसची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कंपनी महिन्याला 35 पेक्षा जास्त फोनची विक्री न करणाऱ्या स्टोअर्सना देखील बंद करणार आहे. एका इंग्रजी वेबसाइटनुसारर, कंपनीच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 

 

अॅपल भारतात प्रीमियम ब्रँड राहावा कंपनीची इच्छा

अॅपलने 2014 मध्ये आयफोन 6 लॉन्च केला होता. याच्या 32 जीबी व्हेरियंटी किंमत 24,900 रुपये आणि 6S वर्जनची किंमत 29,900 रुपये ठेवण्यात आली होती. एक्झिक्युटिव्हने सांगितले की, अॅप्पलने 'डिस्काउंटेड टॅग' हटविण्यासाठी गेल्या वर्षी आयफोन एसईची किंमत 21,000 रुपयांनी वाढविली होती. सोबतच ऑफलाइन स्टोअर्सवर होणारी विक्री बंद करण्यात आली होती. एका एक्झिक्युटिव्हने सांगितले की, आयफोन भारतात एक प्रीमियम ब्रँड राहावा असे कंपनीला वाटते. तसेच कंपनीला आयफोनची सरासरी किंमत वाढवायची आहे. 

बातम्या आणखी आहेत...