आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Discovery : A Preserved Carcass Found For 18000 Years, It May Be The Oldest Dog In The World

बर्फाखाली सापडला जगातील सर्वात जुना कुत्रा, 18 हजार वर्षे पूर्वीचा असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - स्वीडनच्या वैज्ञानिकांना गेल्या वर्षी सायबेरियात बर्फाखाली दबलेल्या एका कुत्र्याचा मृतदेह सापडला आहे. एक वर्ष यावर संशोधन केल्यानंतर हा कुत्रा 18 हजार वर्षे जुना असल्याचा दावा करण्यात आला आहे. बर्फाखाली दबल्यामुळे शरीर खराब झाले नव्हते. त्याच्या शरीरावर केस दिसले आहेत आणि जबडा देखील पूर्णपणे सुरक्षित होता. लव्ह डेलेन आणि डेव्ह स्टंटन या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला. त्यांनी सांगितले की, "आम्ही जेव्हा कुत्र्याचा मृतदेह पाहिला तेव्हा हैराण झालो. हा मृतदेह कुत्रा आणि लांडगा मिश्रित प्रजातीसारखा आहे." याला डॉगर नाव देण्यात आले आहे. मात्र शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याची शारिरीक रचना लांडग्यासारखी आहे. यामुळे यावर आणखी संशोधन करण्याची गरज आहे.  

या नामशेष प्रजातीपासून कुत्रा बनण्याचा अंदाज 


शास्त्रज्ञ स्टंटनच्या मते, संशोधनातून असे दिसून आले आहे की, हे एक दुर्मिळ प्रजातीचे अवशेष आहे. यातून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, कुत्र्यांना नामशेष होणाऱ्या लांडग्यांच्या वंशपासून पाळीव बनवण्यात आले असावे. यानंतर कुत्र्यांमध्ये क्रमिक विकास होत गेला आणि ते पाळीव प्राणी होत गेले.

 

बातम्या आणखी आहेत...