राजकारण / फेसबुक 'पोस्ट'वरून नमिता मुंदडांच्या नाराजीची चर्चा; राजकीय तर्कवितर्क

पोस्टमध्ये शरद पवार यांचा फोटो व पक्षाचे चिन्ह नसल्याने तर्कवितर्कांना उधाण

प्रतिनिधी

Sep 23,2019 09:51:13 AM IST

बीड : केज मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सहा दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही 'फेसबुक पोस्ट' करताना नमिता मुंदडा यांनी पक्षचिन्ह व शरद पवार यांचा फोटो वापरला नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी तसेच ही जागा काँग्रेसला सोडण्याबाबत सुरू असलेली चर्चा ही त्यामागील कारणे असल्याची सूत्रांची माहिती आहे.


केज मतदार संघावर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांनी २२ वर्षे अधिराज्य केले. त्यांच्या निधनानंतर पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे विजयी झाले. २०१४ मध्ये मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. या पहिल्याच निवडणुकीत त्यांना प्रा. संगीता ठोंबरे यांनी पराभूत केले. दरम्यान नमिता मुंदडा यांनी सहा महिन्यांपासून विधानसभा जोरदार तयारी केलेली आहे. मेळावे, सभा, बैठका व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. १८ सप्टेंबर रोजी शरद पवार यांनी केजमधून नमिता मुंदडांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, पडद्यामागे केजची जागा काँग्रेसला सोडण्याच्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी हे केजसाठी आग्रही अाहेत. या सर्व परिस्थितीत २१ सप्टेंबर रोजी नमिता मुंदडा यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर 'येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे, आपला आशीर्वाद असावा' अशी विनंती केली आहे. उमेदवारी जाहीर झाली असताना पुन्हा हा संदेश कशासाठी, शिवाय या पोस्टमध्ये शरद पवार यांचा फोटो व राष्ट्रवादीचे चिन्हही नाही. त्यामुळे नमिता नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
अंतर्गत गटबाजीची भीती


मतदारसंघाचा विकास करायचाय
नमिता मुंदडा यांनी वादाचे कारण ठरलेल्या फेसबुक पोस्टमध्ये दिवंगत नेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करत त्यांचा लोकहिताचा वारसा आपल्याला जपायचा असून मतदारसंघाचा विकास करायचा आहे, अशी टिपण्णी केली आहे. राजकीय जाणकारांच्या मते यामागे कुठल्याही स्थितीत आपण निवडणूक लढणारच आहोत, हे मुंदडा यांनी स्पष्ट केले आहे.

X
COMMENT