आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे म्हणाले, आम्ही तुमच्याच सोबत; आडम उत्तरले, टीका ही भाषणापुरती, लढणे माझे काम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आम्ही तर आजही अन् सत्तेत आल्यावरही तुमच्याच सोबत आहोत, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांना सांगितले. तर श्री. आडम यांनी गरीब, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणे आणि लढत राहणे हे माझे काम. माझी टीका ही भाषणापुरतीच असते, असे उत्तर दिले. 

 

हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी शिंदे चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. चार हुतात्मे, राजमाता जिजाऊ व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर शिंदे परत निघाले. त्यावेळी आडम अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी थांबले होते. ते पाहिल्यावर दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यावेळी हा संवाद झाला. श्री. शिंदे म्हणाले, 'रे नगरातील ३० हजार घरांना मंजुरी आम्ही सत्तेत असताना दिलेली. त्यांनी फक्त पायाभरणी केली, हे विसरू नका. तुमच्या मागणीनुसार बँक गॅरंटीबाबत घोषणा न करून पंतप्रधानांनी तुमची निराशा केली.' 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या विविध विकासकामांचे उदघाटन, रे नगरचे भूमिपूजन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडम मास्तरांच्या गरिबांसाठीच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले. तर, मास्तरांनी मोदी-फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...