आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे कार्यालय साेडून अन्य ठिकाणी जीएसटी दर वाढीची चर्चा- सीतारमण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : महसूल वाढवण्यासाठी जीएसटीच्या दरात वाढ करण्याबाबत माझे कार्यालय साेडून इतरत्र सर्वत्र चर्चा सुरू असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी म्हणाल्या. जीएसटी बैठकीच्या आधी त्यांनी हे वक्तव्य केले.त्या महसुलील घट भरून काढण्यासाठी ५,१२,१८ आणि २८ टक्के जीएसटी दरात वाढ करण्याच्या चर्चेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत हाेत्या. महसूल घटल्यामुळे नवीन अप्रत्यक्ष कर अंमलबजावणीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यात आलेल्या देयकावर परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. सीतारमण म्म्हणाल्या माझे कार्यालय साेडून इतर सगळीकडे ही चर्चा आहे. तथापि जीएसटी दरात हाेणारी वाढ त्यांनी नाकारली नाही. त्या म्हणाल्या आपल्या मंत्रालयाने अद्याप यामध्ये लक्ष घेतलेले नाही.

सीईएने गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययाेजनांबद्दल सांगितले की, व्यवसायामध्ये उदारीकरणाला सातत्याने चालना देण्यात आली. त्याचे फलित म्हणजे वर्ष २०१९ मध्ये ३५ अब्ज डाॅलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.

विदेशी गुंतवणुकीत वाढ 

नाेव्हेंबरपर्यंत दिला १.५७ लाख काेटी रुपयांचा कर परतावा : प्राप्तिकर विभागाने विद्यमान आर्थिक वर्षात नाेव्हेंबरपर्यंत १.५७ लाख काेटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. या आधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षात विभागाने १.२३ लाख काेटी रुपयांचा कर परतावा दिला हाेेता. महसूल सचिव भूषण पांडेय म्हणाले सरकारच्या उपाययाेजनांमुळे जीडीपी वृध्दी दर नीचांकी स्तरावरून वर येण्यास मदत मिळेल.
 

बातम्या आणखी आहेत...