आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशात प्रथमच कुंभच्या स्वच्छतेवर झाली चर्चा : मोदी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृंदावन- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी सोमवारी वृंदावनमध्ये पोहोचले. अक्षय पात्र फाउंडेशनच्या ३०० कोटीवे ताट वाढण्याच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. चंद्रोदय मंदिरात प्रभुपादजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान म्हणाले, गाय आमच्या संस्कृती व परंपरेचा हिस्सा आहे. देशातील पशुपालकांच्या मदतीसाठी बँकांचे दरवाजे उघडले आहेत. बँकांकडून तीन लाखांपर्यंतचे कर्ज मिळेल. या वेळी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या स्वच्छतेचा संदेश दिला गेला. नेहमी कुंभमेळाव्यात नागा साधूंची चर्चा होते. प्रथमच न्यूयॉर्क टाइम्सने कुंभाच्या स्वच्छतेवर वार्तांकन केले. प्रत्येक आईने प्रत्येक मुलापर्यंत पोषण पोहोचवले तर अनेकांचे जीवन वाचेल. 

 

वाजपेयींच्या काळात सुरू झाले, मोदींनी ३०० कोटीवे ताट वाढले 
अक्षय पात्र भोजन कार्यक्रम अटलजींनी १५०० वे ताट वाढण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. आता ३०० कोटीवे ताट नरेंद्र मोदी यांनी वाढले. या वेळी बाहुबली चित्रपटाचे निर्माते चंद्रमाैली व शेफ संजीव कपूर उपस्थित होते. कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्यामुळे मोदींनी क्षमाही मागितली. ते म्हणाले, बाळगोपाळच्या भूमीवर मी सर्वांचे अभिनंदन करतो. 

 

पक्ष काळा पैशाच्या निधीने नाही तर कार्यकर्त्यांमुळे चालतो : शहा 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले की, पक्ष बिल्डर, ठेकेदार व काळ्या पैशाचा निधी देणाऱ्यामुळे चालत नाही तर कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे चालतो. प्रत्येक मतदान केंद्राच्या दोन कार्यकर्त्यांनी 'नमो अॅप'ने हजार रुपयांचे योगदान दिले पाहिजे. लोक देश सोडून पळाले, कारण त्यांच्यासाठी आम्ही कारागृहात सोय केली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...