आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या वादग्रस्त आमदारांची ठाकरेंकडून खरडपट्टी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
महिला सक्षमीकरणाच्या चर्चेवेळी बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विधान परिषदेतील भाजप आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन  घोषणाबाजी केली . - Divya Marathi
महिला सक्षमीकरणाच्या चर्चेवेळी बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विधान परिषदेतील भाजप आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन घोषणाबाजी केली .
  • मतांच्या स्वार्थी राजकारणासाठी मुलगी पळवून आणतो म्हणणारे ढोंगी
  • महिलांना आदराने वागवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

मुंबई - मतांच्या स्वार्थी राजकारणासाठी पाहिजे ती मुलगी पळवून आणतो, अशी वल्गना व सैनिकांविषयी हिणकस वल्गना करणारे ढोंगी जगात दुसरे कोणीही नाही. राजकारणात हरलो तरी चालेल, पण महिलांचा अपमान करणारा एकही नतद्रष्ट पक्षात ठेवणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचा उपमर्द करणाऱ्या प्रवृत्तीची कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली.जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाबाबत सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी विधान परिषदेत प्रस्ताव आणला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या वादग्रस्त आमदारांचे थेट नाव न घेता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या महिलांविषयीच्या वादग्रस्त वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली.  चुकीच्या पद्धतीने कामकाज; विरोधकांचा आरोप 

मुख्यमंत्र्यांनी चर्चा संपल्यावर उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी करत इतर सदस्यांना बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, उपसभापतींनी प्रस्तावावरील चर्चा संपली असल्याचे जाहीर केले. चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू असल्याचा विरोधकांनी आरोप करत गोंधळ घातला. शेवटी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.