आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disgruntled By The BJP's Candidature In Ausha, The Party Has Made Voters Abstain From Rakesh's Rally!

औशात भाजपच्या उमेदवारीवरून नाराज स्वपक्षीयांनीच रास्ता राेकोच्या चक्रव्यूहात मतदारांचा केला अभिमन्यू!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औसा - या विधानसभा मतदारसंघातून भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकरांसह नाराज स्थानिक इच्छुक व समर्थकांनी बुधवारी लातूर-सोलापूर महामार्गावर दीड तास रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक खोळंबली आणि रास्ता रोकोच्या या चक्रव्यूहात मतदारांचाच “अभिमन्यू’ झाला.
 
> मंत्री संभाजी पाटील यांनी यात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता जाम असल्याने त्यांचे वाहन गर्दीत अडकले. अखेर दुचाकीवरून ते पुढे गेले.

> संभाजी पाटील यांचे लहान बंधू अरविंद पाटील निलंगेकर, जि. प. कृषी सभापती बजरंग जाधव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने आदींसह समर्थकांनी हा रस्ता रोखून धरला.

> अभिमन्यू पवार मूळ औसा तालुक्यातील नाहीत. त्यांच्याऐवजी भूमिपुत्रालाच उमेदवारी द्या, अशी मागणी होती. अखेर संभाजी पाटलांनी समजूत काढली.

> दरम्यान, लातूर ग्रामीण मतदारसंघ सेनेला सोडल्याच्या निषेधार्थ भाजपचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत.