आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disha Made A Statement On Age Gap : Salman Said, 'I Am Still Working With A 17 Year Old Girl'

वक्तव्य : दिशाने केले ऐज गॅपवर वक्तव्य सलमान म्हणाला - 'मी अजूनही 17 वर्षांच्या मुलीसोबत काम करतो आहे...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : दिशा पाटनीने भारत फिल्ममध्ये पहिल्यांदा सलमान खानसोबत काम केले आहे. पण एकाच चित्रपटानंतर कदाचित ती आता सलमानसोबत काम करू शकणार नाही. एका इंटरव्यूदरम्यान स्वतः दिशाने याबाबतीत सांगितले. दिशा म्हणाली - 'मला या फिल्मसाठी डायरेक्टर अली अब्बासने कॉल केला होता की, फिल्ममध्ये माझा रोल स्पेशल अपीरियंसपेक्षा जास्त असेल. मी या रोलसाठी हो म्हंटले कारण हा रोल सलमानच्या अपोझिट होता. मला वाटले माहित नाही मी यापुढे कधी सलमानसोबत काम करू शकेन की, नाही. अली सरदेखील स्क्रिप्ट ऐकवताना मला हेच म्हणाले होते.'

 

एजगॅपबद्दल केले दिशाने वक्तव्य... 
जेव्हा तिला याबद्दल विचारले गेले की, तिला से का वाटले की, तिला यापुढे सलमानसोबत काम करता येणार नाही ? यावर दिशा यावर दिशा म्हणाली की, तिच्या आणि सलमानच्या वयामध्ये खूप अंतर आहे. फिल्ममध्ये ती आणि सलमान यंग एज रोलमध्ये आहेत. त्यामुळे मला त्याच्या अपोजिट घेतले गेले. यानंतर कदाचित माझ्या लायक रोल सलमानच्या फिल्ममध्ये नसेल. त्यामुळे मी फिल्मसाठी लगेच हो म्हणले.  

 

दिशाच्या वक्तव्यावर आली सलमानची प्रतिक्रिया... 
दिशाच्या या रक्तव्यानंतर सलमान खानचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमान एका इंटरव्यदरम्यान म्हणाला, 'ती कोणत्या ऐज गॅपबद्दल बोलत आहे ? मी आजही 17 वर्षांच्या अभिनेत्रींसोबत फिल्म करत आहे.'

बातम्या आणखी आहेत...