Health / रिंग डिप्स आिण जिम्नॅस्टमुळे फिट राहते दिशा पटानी 

योग आणि व्यायाम करतानाचे दिशा पटानीचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. तिच्या व्यायामाच्या दिनचर्येला कित्येक मुली फॉलो करतात. जाणून घ्या, कोणत्या पौष्टिक आहारामुळे दिशा तंदुरुस्त राहते...

दिव्य मराठी वेब

Aug 05,2019 12:15:00 AM IST

योग आणि व्यायाम करतानाचे दिशा पटानीचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. तिच्या व्यायामाच्या दिनचर्येला कित्येक मुली फॉलो करतात. ती व्यायामाशिवाय पौष्टिक आहारामुळे तंदुरुस्त राहते.


तिचा वर्कआऊट
- दिशा रिंग डिप्स आिण वेटलिफ्टिंग करते यामुळे मांसपेशीला मजबुती मिळते.
- ती ट्रेंड जिमनॅस्ट असून कार्डिओसह लाइट वेट ट्रेनिंगही करते. यामुळे शरीर आकारात राहते.
- योग आणि मेडिटेशन तिच्यासाठी दररोजच्या दिनचर्येचा एक भाग आहे. यामुळे शारीरिक आिण मानसिक दोन्ही प्रकारचे व्यायाम होतात.
- तिला नृत्याची खूप आवड आहे. यामुळे वजन कमी होते. याशिवाय तणाव दूर करण्यासही मदत करते.


तिचा आहार
दिशा प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सयुक्त आहार घेते. तिला अंडी, दूध, ओट्स आिण कॉर्नफ्लेक्स घ्यायला आवडते. तिला फळांपासून तयार केलेले सलाद आिण ज्यूस खूप आवडते. रात्रीच्या जेवणात ती सूप, ब्राऊन राइस आणि वरण खाते.

X
COMMENT