सोशल मीडिया : ट्रोलिंगबद्दल बोलली दिशा पाटनी, ऑनलाइन अनेक फ्रस्टेटेड लोक आहेत जे स्वतःच्या आयुअस्यात सुखी नाहीत 

ट्रोलिंगमुळे परेशान होत नाही दिशा... 

दिव्य मराठी

Apr 28,2019 10:58:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये केवळ दोनच चित्रपटात केलेले आहेत. पण तीच्ये फॅन फॉलोइंग मात्र दमदार आहे. इन्स्टाग्रामवर दिशाचे 20 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि दिशा स्वतःला सोशल मीडिया क्रेजीदेखील म्हणते. अशातच दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये दिशाने सांगितले, 'मी माझे इन्स्टाग्राम स्वतःच हॅण्डल करते आणि ते लोकांशी संवाद साधण्याचे एक चांगले साधन आहे. यामुळे तुम्ही फॉलोवर्सला आपल्या प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट देऊ शकता आणि त्यांच्याकडून फीडबॅकदेखील घेऊ शकता.

ट्रोलिंगमुळे परेशान होत नाही दिशा...
दिशाने पुढे सोशल मीडियावर सतत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही सांगितले. ती म्हणाली, 'मी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. ऑनलाइन अनेक असे लोक आहेत जे फ्रस्टेटेड आहेत आणि आपल्या आयुष्यात खुश नाहीत. अशा लोकांना दुसर्यांबद्दल चुकीचे बोलण्यात आनंद मिळतो. मी पॉजिटीव्ह गोष्टींकडे लक्ष देते आणि खुश राहणे पसंत करते.

भारतमध्ये दिसणार आहे दिशा...
दिशा सध्या फिल्म भारतमुळे चर्चेत आहे. ती यामध्ये सलमान खानच्या अपोजिट दिसणार आहे. फिल्मच्या ट्रेलरमध्ये असलेल्या सलमान आणि तिच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक होत आहे. त्यांनतर आलेले गाणे स्लो मोशनमध्येही दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. फिल्म 5 जूनला रिलीज होणार आहे.

X