आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारत' मध्ये सलमानची बहीण नाही, तर त्याच्या लव्ह इंट्रेस्टच्या भूमिकेत दिसणार दिशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: पाच दशकांची कथा सांगणा-या 'भारत' चित्रपटात दिशा पाटनी ट्रॅपजी आर्टिस्ट(कलाबाजी करणारे)ची भूमिका साकारणार आहे. तिच्या या भूमिकेसाठी अलवीरा अग्निहोत्री आणि ऐश्ले रेबेलो कॉस्ट्यूम डिझाइन करत आहेत. हे कॉस्ट्यूम वेटरन अॅक्ट्रेस हेलेनच्या कॉस्ट्यूमने इंस्पायर्ड असतील. चित्रपटाच्या स्टाइलिंग टीमने दिशाच्या कॉस्ट्यूमवर चांगलाच रिसर्च केला आहे. 


सर्कसच्या कॉस्ट्यूमकडून इंस्पिरेशन 
यासाठी त्यांनी 1960 च्या सर्कसच्या शोजमध्ये वापरात येणा-या कॉस्ट्यूम्सकडून इंस्पिरेशन घेतले. तसेच त्या काळातील 'रिंगलिंग ब्रोस अँड बरनम अँड बेली सर्कस'च्या कलाकारांना आणि फोली डान्सर्सचा लुक लक्षात घेण्यात आला.
- दिशाचे एक आउटफिट स्टोन्स, क्रिस्टल आणि मोत्यांनी सजवण्यात आल्याचे बोलले जातेय. दिशा सध्या तिच्या पात्रासाठी जबरदस्त ट्रेनिंग घेतेय. तिने नुकतेच मुंबईमध्ये चित्रपटाचे पहिले शेड्यूल रॅपअप केले आहे. 

 

पुन्हा सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार तब्बू 
या चित्रपटात सलमानच्या अपोजिट कतरिना आहे. यासोबतच दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवरही प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. दिशा या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार अशा चर्चा होत्या. परंतू तब्बू त्याची बहीण असणार आहे. तिची भूमिका जास्त मोठी नाही, परंतू महत्त्वाची आहे. तर दिशा या चित्रपटात सलमानच्या लव्ह इंट्रेस्टच्या भूमिकेत असेल. तब्बू यापुर्वी सलमानच्या 'जय हो' चित्रपटात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...