कपड्यांवरून पुन्हा ट्रोल / कपड्यांवरून पुन्हा ट्रोल झाली टायगरची गर्लफ्रेंड: यूजर्स म्हणाले, डिनरला कुणी असे कपडे घालतं का; तर कुणी म्हणे, खाली पडदा घातलाय का?

दिव्य मराठी वेब टीम

Nov 22,2018 12:57:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी आपल्या पेहरावामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आहे. काही ट्रोल्सनी तिला डिनरला काय घालावे आणि काय घालू नये यासंदर्भात उपदेश दिले. तर काहींनी तिची थट्ट उडवली. टायगर आणि दिशा डिनर डेटवर होते. यावेळी टायगरने नॉर्मल ड्रेस-अप केले होते. तर दिशाने व्हाइट कलरचा टॉप आणि लूज लाइट ब्राउन कलरचा लोअर घातला होता. दिशाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर ट्रोल्स तिच्या मागे हात धुवून लागले. त्यापैकी एकाने प्रश्न विचारला- डिनरला कुणी असे कपडे घालतं का? तर दुसऱ्याने किती घाणेरडी फॅशन आहे अशी टीका केली. एकाने तर तिला खाली काय पडदा घातला की काय असे म्हणत तिची थट्टा उडवली.


टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचे नेहमीच एकमेकांसोबत फोटो समोर येतात. त्यामध्ये सर्वांच्या नजरा फक्त दिशाच्या कपड्यांकडे असतात. नुकतेच तिच्या एका फोटोवरून वाद झाला होता. दिवाळीनिमित्त शेअर करण्यात आलेल्या तिच्या फोटोवर लोकांनी राग काढला होता. दिवाळीला तिच्या त्या फोटोमध्ये दिशाने हातात दिवा धरला होता. तसेच खाली लेहंगा आणि वर फक्त स्पोर्ट्स ब्रा आणि छोटासा दुपट्टा घेतला होता. यानंतर तिने तो फोटो विचित्र पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगून नॉर्मल आणि एडिटेड असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

X
COMMENT