आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disha Patani's Gym Video Has Been Viral, Tiger Shroff Also Get Shocked If He Saw Disha Like This

दिशा पाटणीचा जिम व्हिडीओ झाला व्हायरल, अभिनेत्रीला वेट उचलताना पाहून टायगर श्रॉफलाही घाम फुटेल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'भारत' मध्ये आपली भूमिका चांगल्या पद्धतीने निभवाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी आता आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे. सध्या दिशा जिममध्ये रोज एक्सरसाइज करते दिशा पाटणीने अशातच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जिमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेटलिफ्टिंग करत आहे. दिशा पाटणीने आपल्या हातात 140 पाउंड (63 किलोग्राम) एवढे वजन उचलले आहे. दिशा पाटणीच्या या व्हिडिओमध्ये ती आपल्या फिटनेससाठी एवढी मेहनत करत आहे की, जर तिचा हा व्हिडीओ फिटनेस किंग आणि तिचा मित्र टायगर श्रॉफने पहिला तर त्यालाही घाम फुटेल. दिशा पाटणीचा व्हिडीओ काही वेळापूर्वीच शेअर झाला होता आणि आता तो वेगाने व्हायरलही होत आहे.  

 

 

चित्रपट 'भारत' मध्ये 'राधा' च्या भूमिकेने सर्वांचे मन जिंकणारी दिशा पाटणी आता फिटनेस क्वीन बनण्याच्या तयारीत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये दिशा पाटणी वेट लिफ्टिंग करत आहे. व्हिडीओ पोस्ट करून दिशा पाटणीने लिहिले, '140 पाउंड (70-70 पाउंड दोन्ही बाजूला), 110 पाउंड (55 पाउंड दोन्ही बाजूला). शक्ति प्रशिक्षण आणि यासाठी तुम्ही माझी मेहनत पाहू शकता.' आपल्या कॅप्शनमध्ये दिशा पाटणीने सांगितले की, वेट लिफ्टिंग करताना सुमारे 63 किलोग्राम आणि 50 किलोग्राम वजन उचलले. दिशा पाटणीच्या या व्हिडिओमध्ये तिची मेहनत पाहण्यासारखी आहे.