आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्यांपासून बनलेल्या डिश वाढवतील प्रतिकारशक्ती व ताकद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या ऋतूमध्ये बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या मिळतात. यापासून बनवलेल्या डिशमधील पोषक द्रव्ये आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने वजन कमी करण्यातही त्या सहायक ठरतात. आपल्या आहारात यांचा समावेश करा.

  • पालकाची भाजी

भरपूर प्रथिने, कार्बोदके आणि फायबर्स असलेली पालकाची भाजी अवश्य खावी. यातील नायट्रेट रक्तदाब कमी करण्यामध्ये मदत करते. तसेच हृदयविकारापासूनही बचाव होतो. यातील फोलेट कॅन्सरपासून बचाव करण्यात मदत करते.

  • मोहरीची भाजी

कॅलरी आणि फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये कार्बोदके, फायबर्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, सी, डी, बी-१२, मॅग्निशियम, लोह आणि कॅल्शियम भरपूर असते. सोबतच यामधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि हिवाळ्यातील आजारांपासून बचाव होतो. यातील कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे हाडे बळकट व निरोगी राहतात.

  • मेथीची भाजी

मेथीची भाजी नियमित खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल व लिपिड स्तर नियंत्रित राहतो. यामुळे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहतो आणि मधुमेहाची शक्यता कमी राहते. यात फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी-६, सी, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते. मेथी फायबरचा उत्तम स्रोत असून यामुळे पचनक्रियाही चांगली राहते.

  • चाकवताची भाजी

यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम आढळते. या भाजीची डिश खाल्ल्याने मूतखडा होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. याशिवाय या भाजीमुळे पोटदुखी, गॅस, मलावरोध आणि अॅसिडिटी आदी समस्यादेखील दूर होतात. ही भाजी तुम्ही कालवण, कोशिंबीर, पराठा आणि त्याच्या पुऱ्या बनवूनही खाऊ शकता.

  • तांदळीची भाजी

यातील लायसिन नावाचे अमिनो अॅसिड वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. या भाजीमध्ये फायटोन्यूट्रियंट्स, अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. हिवाळ्यात ही भाजी खाल्ल्याने शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढता येते. सर्दी-खोकल्यामध्ये ही भाजी खाणे फायद्याचे ठरते.

बातम्या आणखी आहेत...