आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज खरेदी करण्यास महावितरणचा नकार, परळीचे थर्मल बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - राज्यात एकीकडे विजेच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागावर भारनियमनाचा मोठा भार सुरू असून  दुसरीकडे  परळीच्या औष्णिक वीज केंद्रातून तयार होणारी महागडी वीज  खरेदी करणे महावितरणने बंद केल्याने मुबलक पाणी व कोळसा असताना वीज निर्मिती ठप्प झाली आहे. सध्या दैनंदिन कामकाजासाठी दररोज एक युनिट वीज बाहेरून आयात करावी लागत आहे. 


चंद्रपूर व आंध्र प्रदेशातून परळीत वीज निर्मितीसाठी येणारा कोळसा वाहतुकीच्या खर्चामुळे महाग पडत असल्याने येथे तयार होणारी वीज राज्यातील अन्य औष्णिक वीज केंद्राच्या तुलनेने महागडी पडत असल्याने महावितरणने ही वीज घेण्यास नकार दिला अाहे. परिणामी या केंद्रातील आठही संच सध्या बंद करण्यात आले आहेत. 
प्रादेशिक विकासाचा समतोल राहावा म्हणून १९७१ मध्ये परळी येथे उभारण्यात आलेल्या औष्णिक वीज केंद्रात आठ संचांची निर्मिती करण्यात आली. सध्या संच क्रमांक १ ते ३  कायमचे बंद करण्यात आले अाहेत. संच क्रमांक ४,५,८,७  हे  वीज  निर्मितीसाठी  सक्षम असताना विजेच्या  मागणीअभावी ते दीड वर्षापासून बंद आहेत तर संच क्र. ८ मधून फेब्रुवारी २०१९ पासून वीजनिर्मिती सुरू होती, परंतु मागणीच नसल्याने या संचातून होणारी वीजनिर्मिती थांबली आहे. राज्यातील नाशिक वगळता सर्व वीज केंद्रे ही दगडी कोळशाच्या खाणी असलेल्या प्रदेशात आहेत.  येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला दररोज ३५०० ते ४०००  मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. कोळशातही तीन प्रकार असून उच्च, मध्यम व कनिष्ठ दर्जाचा कोळसा महानिर्मिती खरेदी करते. येथील केंद्रासाठी चंद्रपूर येथून डब्ल्यू सी. एल.  व आंध्र प्रदेशातून  पीपीएस  या  कंपनीकडून  कोळसा  खरेदी केला जातो.  रेल्वे वॅगनद्वारे हा कोळसा  केंद्राकडे आणला जातो. निकृष्ट दर्जाचा कोळसा खरेदी केला जात असल्याने वीज निर्मितीचे प्रमाण कमी आहे.  परळीसाठी कोळशाची वाहतूक ही ५००  कि.मी.अंतरावरून केली जात असल्याने या वाहतुकीचा खर्च इतर वीज केंद्राच्या तुलनेने दुप्पट असल्याने परळीची वीज महाग असल्याने वीज वितरणकडून ती खरेदी करणे बंद करण्यात आले आहे. एकीकडे मागणी नसल्याचे कारण दाखवत परळीची वीज खरेदी केली जात नाही तर दुसरीकडे विजेची उपलब्धता कमी असल्याच्या कारणावरुन मराठवाड्यात भारनियमन केले जात आहे.


विरोधाभास निर्माण करणारे चित्र : महावितरणने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज विकत घेणे बंद केल्याने हे केंद्रच बंद पडले आहे. तर दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात वीज तुटवडा असल्याने हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे आहे. 

 

दररोज १ युनिट वीज आयात 
एकेकाळी वीजनिर्मितीमध्ये अनेक उच्चांक प्रस्थापित  राज्यातील भारनियमन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परळी  येथील केंद्रातून तयार होणारी वीज खरेदी करण्यास महावितरणने नकार दिल्याने केंद्रातून वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. दररोज एक युनिट वीज बाहेरुन आयात करत आहे.

 

मागणी आली तर संच सुरू करू 
महावितरण कंपनीकडून विजेची मागणीच नसल्याने  सध्या  संच क्र.८  मधून सुरू असणारी  वीज निर्मिती बंद  करण्यात आली आहे. परळीच्या औ.वि.केंद्रात कोळसा व पाणी उपलब्ध अाहे. महावितरणकडून मागणी आल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे संच सुरु करु. 
प्रकाश खंडारे, मुख्य अभियंता,
 

बातम्या आणखी आहेत...