आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्नेचे मिकी माऊस हे पात्र झाले 90 वर्षांचे, मिकीच्या वाढदिवसानिमित्त वाचा काही रंजक माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिकी माऊसचा पहिला चित्रपट "स्टीमबोट विली' आजच्याच दिवशी १९२८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच पात्राने अॅनिमेशन जगतात वॉल्ट डिस्नेच्या साम्राज्याचा पाया रचला. आज डिस्नेची कमाई ८८० अब्ज रुपयांपेक्षाही जास्त आहे. थिएटरमध्ये मिकीचा शेवटचा लघुपट २०१३ मध्ये आला होता. म्हणजे, गेल्या ५ वर्षांपासून मिकी माऊस मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. तरीही वॉल्ट डिस्ने कंपनीच्या एकूण ग्राहकोपयोगी उत्पादनात ४० टक्के विक्री त्याच्यामुळेच होते. मिकीच्या वाढदिवसानिमित्त वाचा काही रंजक माहिती - 

 

लाइफ ऑफ मिकी 
जन्म : सशापासून उंदरापर्यंत वाल्ट डिस्नेने पहिले ओसवॉल्ड सशाचे पात्र रंगवले. परंतु युनिव्हर्सल स्टुडिओजने त्यांच्याकडून हे पात्र हिसकावून घेतले. तेव्हा वॉल्टने मिकी माऊस तयार केला. पहिला चित्रपट "प्लेन क्रेझी'ला वितरक मिळाले नाहीत. म्हणून १८ नोव्हेंबर १९२८ रोजी स्टीमबोट विली प्रथम प्रदर्शित झाला. 

 

नाव आणि आधी शब्द : मॉर्टिमार आणि हॉट डॉग- आधी मिकी माऊसचे नाव मॉर्टिमर असे ठेवण्यात आले. परंतु वॉल्ट यांच्या पत्नीला हे नाव आवडले नाही. त्यांनी हे नाव बदलून मिकी असे ठेवण्यास सांगितले. आठ चित्रपट आल्यानंतर मिकीचा पहिला शब्द "हॉट डॉग्ज' होता. चित्रपट होता "कार्निव्हल किड' 

 

चार बोटे व हातमोज्यांचे गुपित : अॅनिमेटेड चित्रपटाच्या एका दृश्यासाठी खूप चित्रे तयार केली जातात. म्हणजे एका बोटाच्या हालचालीसाठी जास्तीची चित्रे तयार करावी लागतात. दुसरे कारण, वॉल्ट डिस्ने यांनी सांगितले होते की, त्यांना उंदराची पाच बोटे केळीच्या फणीप्रमाणे वाटतात. 

बातम्या आणखी आहेत...