आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऑपरेशन ब्लू स्टार'च्या 35 वर्षे पूर्तीवर स्वर्ण मंदिरमध्ये गोंधळ, भिंडरावालाचे टी-शर्ट घालून पोहचले होते आंदोलक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर(पंजाब)-अमृतसरमधील श्री हरमंदिर साहिबमध्ये शीख समाजातील काही लोक प्रदर्शन करत असताना मोठा गोंधळ झाला. यावेळी ऑपरेशन ब्लू स्टारला 35 वर्षे पूर्ण झाल्यानिमीत्त कटू आठवणींना उजाळा देण्यासाठी आज(6जून)ला शीख समाजातील काही लोक प्रदर्शन करत होते. या प्रदर्शनाचे रूपांतर मोठ्या गोंधळाचे तेव्हा झाले, जेव्हा काही लोकांनी जरनैल सिंग भिंडरावालाचा फोटो असलेले टी-शर्ट घालून त्याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांनी खालिस्तान जिंदाबादच्या घोषणे देणे सुरू केले होते. यावेळी अनेक लोकांकडून हवेत तलवार भिरकवण्यात आल्या. या घटनेत काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या गोंधळामुळे स्वर्ण मंदिरातील रेलिंगदेखील तुटली. तिथे उपस्थित लोकांनी कसे-बसे लोकांना शांत करून हकलून लावले.


मिळालेल्या माहितीनुसार, अकाल तख्त साहिबच्या जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग ऑपरेशन ब्‍लू स्‍टारमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या सन्मानासाठी एकत्रित आले होते. त्यावेळी अचानक सरबत खालसाच्या जत्थेदार ध्यान सिंग मंड अकाल तख्तच्या खाली थांबून संदेश वाचू लागले. त्यांना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीच्या अधिकाऱ्यांनी थांबवल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा सुरू केल्या. मंडच्या समर्थक इतके उग्र झाले की, त्यांनी श्री हरिमंदिर साहिबच्या मध्ये असलेले बॅरिकेट तोडले. यावेळी जोरदार धक्का-बुक्की झाली आणि हवेत तलवार आणि कृपाण भिरकवण्यात आले.


मंड समर्थकांच्या घोषणांमध्ये अकाली दल अमृतसरचे अध्यक्ष सिमजीत सिंह मानदेखील अकाल तख्त साहिबजवळ समर्थकांसहित पोहचले. मान यांच्या समर्थकांनी खालिस्तानचा कथित झेंडा फडकवला. मान यांचे समर्थकांनी लहान स्पीपक आणला होता, त्यावर ते लगेच भाषण देऊ लागले. त्यानंतर शिरोमणि कमेटीने श्री हरिमंदिर साहिबच्या मध्ये लागलेल्या स्पीकरचा आवाज वाढवला, म्हणजेच मंड यांचे भाषण ऐकू येणार नाही. त्याच्या काही वेळानंतर सगळे आदोंलक निघून गेले. त्यानंतर मीडियाला बोलावून अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारने आपल्या बंद रूममध्ये संदेश ऐकवला. सरबत खालसाच्या जत्थेदार बलजीत सिंग दादूवाल तिथे पोहचले होते, तर बरगाड़ी मोर्चाची कमेटीचे समर्थकदेखील तिथे पोहचले होते.