आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडी लावण्यावरून वाद; राॅडनेे युवकाचे डाेके फाेडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : भाजीपाला विक्रीच्या हातगाड्या लावण्यावरून दोन हॉकर्समध्ये शनिवारी सकाळी ११.३० वाजता सुभाष चाैकात वाद झाला. यात एकाने लोखंडी रॉड मारून दुसऱ्याचे डोके फोडले. या घटनेमुळे सुभाष चौक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. घटनेनंतर पाेलिसांनी हाॅकर्सला जागा रिकामी करण्याच्या सूचना केल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी हॉकर्सला व्यवसाय करू देण्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, सुभाष चाैक या भागात 'नो हॉकर्स झोन' घोषित केला अाहे तरीदेखील भाजीविक्रेते बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत आहेत.    राजू सखाराम पाटील (वय ३७, रा. कासमवाडी) असे जखमी हॉकर्सचे नाव आहे. त्यांना शेख इमरान शेख इजाजुद्दीन (वय २२, रा. शाहूनगर) याने मारहाण केली आहे. बाजाराचा दिवस असल्यामुळे शनिवारी सकाळपासून सुभाष चौक, बळीरामपेठ या भागात हॉकर्स, ग्राहकांची गर्दी झाली होती. यात चौबे शाळेजवळील शुभदा प्रोव्हिजन्स हे दुकान बंद होते. या दुकानाच्या बाहेर राजू पाटील यांनी हातगाडी उभी केली. या कारणावरून इमरान व त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाले. काही दुकानदारांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला; परंतु, काही वेळाने पुन्हा एकदा दोघांत वाद सुरू झाला. या वेळी इमरान याने लोखंडी रॉड डोक्यात मारून राजू पाटील यांना गंभीर जखमी केले. राजू पाटील जमिनीवर कोसळल्यानंतरही इमरान त्यांना मारहाण करीत होता. त्यामुळे त्यांची आई सुशीलाबाई व मुलगा दुर्गेश हे भांडण सोडवण्यासाठी आले. इमरानने त्या दोघांनाही मारहाण केली. या घटनेमुळे पळापळ झाली. जखमी पाटील हे १० मिनिटे विव्हळत पडले होते. काही हॉकर्सने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यावर १४ टाके घालण्यात आले आहेत. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इमरानविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी इमरान याला ताब्यात घेतले आहे. जखमीच्या डाेक्यावर घातले १४ टाके; एक युवक ताब्यात    घटनास्थळी डीवायएसपींची भेट  घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम, शनिपेठचे विठ्ठल ससे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. रोहन यांनी इतर हॉकर्स, दुकानदारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. यानंतर इमरान याला ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...