आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disruption In Aghadi ; The Name Was Decided, The Friendly Party Was Decided, But The Seats Did Not Agree

आघाडीत बिघाडी; नाव ठरले, मित्रपक्ष ठरले, पण जागांवरच एकमत होईना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेसाठी मोट बांधत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर बुधवारी मोठी नामुष्की ओढावली. मित्रपक्षांनी जागांसाठी चांगलेच ताणून धरल्याने जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आघाडीची ठोस घोषणा न करत मित्रपक्षांना योग्य जागा देऊ, अशी बोळवण आघाडीला करावी लागली. मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या संयुक्त आघाडीची घोषणा दुपारी ३ वाजता होणार होती. सर्व तयारी करून आघाडीच्या नावाचा फलक सभागृहात लावला होता. मात्र चर्चेला बसलेल्या नेत्यांचे एकमत काही झाले नाही. त्यांची चर्चा संपता संपेना. तसेच तिढाही काही सुटला नाही. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माध्यम प्रतिनिधींना सामोरे गेले. इतर छोट्या पक्षांचे जागा वाटपावर अडले आहे. ती चर्चा आज पूर्ण होणार नाही. आघाडीचा निर्णय तुम्हाला जेव्हा होईल, तेव्हा कळवण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. 
 

बैठकीला नऊ पक्ष :
आघाडीच्या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, सपा, भाकप, माकप, जनता दल, बीआरएसपी, बविआ, पीआरपी असे नऊ छोटे पक्ष सहभागी आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
 

वैतागलेले आझमी म्हणाले, चर्चा यहाँ, निर्णय दिल्ली में 
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आघाडीच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली. ‘काँग्रेस के लोग चर्चा यहाँ करते है, मगर इन के निर्णय दिल्ली में होते है,’ असे ते म्हणाले. भिवंडी पूर्व, मानखुर्द-शिवाजीनगर आणि औरंगाबाद पूर्व असे या ३ जागा सपासाठी सुटल्याचे आझमी यांनी सांगितले.
 

दिवसभर बैठक सत्र
सकाळी वडेट्टीवार तर दुपारी धनंजय मुंडेंकडे नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मित्तल टाॅवरमधील कार्यालयात खलबते झाली. पण, घाडीतील तिढा सुटला नाही.
 

नाव ठरले, मित्र नाही
पत्रकार परिषद चव्हाण सेंटरमधील ज्या रंगस्वर सभागृहात होणार होती, तेथे आघाडीच्या नावाचा फलक लावण्यात आला होता. त्यावर संयुक्त पुरोगामी महाआघाडी असे नाव छापलेले होते.
 

बातम्या आणखी आहेत...