आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Distribution Of Awards At The Hands Of The President; Olympian Bajrang, Deepa Malik' Will Honored 'Khel Ratna'

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण; ऑलिम्पियन बजरंग, दीपा मलिक यांचा सर्वाेच्च ‘खेलरत्न’ने गाैरव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी  दिल्ली - राष्ट्रपती भवनात आज गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलेटिक्स दीपा मलिक यांचा सर्वाेच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गाैरव करण्यात येणार आहे. याशिवाय या पुरस्कार वितरण साेेहळ्यामध्ये अर्जुन, द्राेणाचार्य आणि जीवन गाैरव पुरस्काराने खेळाडूं, प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येईल.  यामध्ये १९  खेळाडू हे  अर्जुन, तीन प्रशिक्षक हे  द्रोणाचार्य, तीन दिग्गज खेळाडू जीवन गाैरव, चार खेळाडू ध्यानचंद, चाैघे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन  पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तसेच यादरम्यान यंदा तीन विद्यापीठांना  मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी देऊन गाैरवण्यात येणार आहे. या पुरस्कार साेहळ्यासाठी सर्वच विजेते खेळाडू व प्रशिक्षक यांचे दिल्लीमध्ये आगमन झाले आहेत. 

प्रशिक्षकासाठी िदला जाणारा द्राेणाचार्य पुरस्कार हा सर्वच स्तरावरून दिला जावा. कारण, युवा खेळाडूंच्या पायाभरणीची महत्वाची  कामगिरी तळातील प्रशिक्षक प्रचंड मेहनतीमधून करत असतात. त्यामुळेच प्रतिभावंत खेळाडू घडतात आणि हेच खेळाडू देशाच्या नावलाैकिकास साजेशी कामगिरी करतात. त्यामुळे हे घडवणाऱ्या  या पुरस्कारान गाैरव व्हावा, अशी प्रतिक्रीया भारतीय नेमबाज गगन नारंगने दिली. 

‘द्रोणाचार्य’पेक्षाही स्वप्नाकडूनच सन्मान अभिमानास्पद : कोच
अर्जुन पुरस्कार स्विकारण्यासाठी दाखल झालेल्या हेप्टाथलीट  स्वप्ना बर्मन  ने आपल्या यशाबाबतची प्रतिक्रीया दिली. ‘वडीलांना लकवा  झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना साेडून आईला आता साेबत येणे  शक्य नाही. प्रशिक्षक सुभाष  सरकार यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हा इथपर्यंतचा यशाचा पल्ला गाठता आलाा. त्यामुळे त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा पुरस्कार स्विकारण्याची मी त्यांना विनंती केली.  त्यामुळे आता ते साेबत आहेत,असेही ती म्हणाली.  सुभाष यांनी यंदा द्राेणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज केला हाेता.  त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही.मात्र,स्वप्नाकडूनचा सन्मान हाच माेठा  गैरव आहे,असे ते म्हणाले.

बॉडीबिल्डर भास्करन हाेता कारपेंटर  
बॉडीबिल्डिंगमध्ये एस. भास्करसल अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. त्याने करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करता हे यश संपादन केले आहे.यासाठी त्याला सातत्याने खडतर प्रवास करावा लागला. त्याची घरची आर्थिक परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळेच शरीरसाैष्ठव म्हणुन लागणाऱ्या डायटसाठी त्याला पार्टटाइम जाॅब करावा लागला. यासाठी त्याने कारपेंटर म्हणूनही काम केले हाेते.

आता लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशिप :  
कुस्तीमध्ये यंदा अव्वल कामगिरी केल्यामुळे  महिला  मल्ल पुजा ढांडाला अर्जुन पुरस्काराने गाैरवण्यात येणार आहे. या साेहळ्यासाठी ती देखील दिल्लीमध्ये दाखल झाली. ‘ आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अव्वल  कामगिरी करून पदक जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. त्यासाठी मी कसून  मेहनत घेत आहे. त्यामुळे केलेल्या मेहनतीचे फळ मला पदकाच्या रुपाने मिळणार आहे,असेही ती म्हणाली. 

बातम्या आणखी आहेत...