आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4.74 कोटी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, या योजनेचे होणार वितरण; निवडणूक आयोगाने दिली मंजूरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली -  'पंतप्रधान शेतकरी सन्मान योजन'अंतर्गत 4.74 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळणार आहे. 10 मार्च रोजी आचारसंहितेच्या अंमलबजावणीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे फक्त त्याच शेतऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याची माहिती शनिवारी एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलतांना दिली.

 

निवडणूक आयोगाने दिली मंजूरी 
सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे 2-2 हजार पात्र शेतकऱ्यांना देण्याची कृषी मंत्रालयाला परवानगी दिली आहे. निवडणूकने म्हटले आहे की, 10 मार्चअगोदर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना निधी हस्तांतरीत करू शकतात. अधिकाऱ्याच्या मते, या 4.74 कोटी शेतकऱ्यांपैकी 2.74 कोटी शेतकऱ्यांना पहिला हप्त्याचा लाभ मिळाला आहे. तर 2 कोटी शेतकरी नव्याने या योजनेशी जोडल्या गेले आहेत. या नवीन शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पहिल्या हप्त्याचे 2 हजार मिळतील. तर दुसऱ्या हप्त्याचे 2-2 हजार रूपये 1 एप्रिलपासून त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सुरुवात होईल. 


शेतकऱ्यांच्या नोंदणीचे काम सुरुच 
या योजनेअंतर्गत देशातील 12 कोटी छोटे आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. पण आम्ही आचारसंहितेची अंमलबजावणीपूर्वी 4.74 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांची नोंदणीचे काम सुरु आहे. यावेळी 4.74 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलतांना सांगितले. 


अंतरिम अर्थसंकल्पात झाली होती घोषणा 

मोदी सरकारने लोकसभा निवडणूकीच्या पहिले अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी सन्मान निधी योजनेची शुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत 2 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान भागात 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. 1 डिसेंबर 2018 पासून या योजना लागू करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात पहिला हप्ता देण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात 20 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...