आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अन्नदाता सुखी भव:' संकल्पनेतुन शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचे वाटप; गणेशोत्सवातील विनाकारण होणारा खर्च टाळून केली मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी - कामती खुर्द ता मोहोळ येथील सुदर्शन मध्यवर्ती गणेश तरुण मंडळाने शेतकऱ्यांना गणेश उत्सवातील स्पीकर, लाईट डेक्रोशन इतर खर्चाला फाटा देत परिसरातील 160 शेतकऱ्यांना अन्नदाता सूखी भव या संकल्पनेतून प्रति शेतकरी 4 किलो प्रमाणे  640 किलो ज्वारी बियाणे व प्रति ज्वारी पिशवी नुसार 50 किलो युरिया प्रमाणे 8 हजार किलो युरिया वाटप करण्यात आला आहे. याची सुरुवात माजी आमदार राजन पाटिल यांच्या हस्ते करण्यात आली.
सध्याची बदललेली नैसर्गिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील सुदर्शन मध्यवर्ती तरुण मंडळाने राबवलेला बियाणे व खत वाटपाचा  'अन्नदाता सुखी भव:' हा उपक्रम शेतकऱ्यांची उमेद वाढवणारा व शेतकऱ्यांविषयी सद्भावना  जागृत करणारा आहे असे राजन पाटील म्हणाले.

दिनांक 10 सप्टेंबर रोजी कामती खुर्द येथील सुदर्शन मध्यवर्ती तरुण मंडळाच्या वतीने गावातील गरजू, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक बॅग ज्वारीचे बियाणे व एक बॅग खत प्रातिनिधिक स्वरूपात 10 शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर उर्वरित नोंद करून मागणी केलेल्या, निवड झालेल्या 160 शेतकऱ्यांना कुपन देऊन स्वतः घेऊन जाण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
या उपक्रमाची गरज, उद्देश, स्वरूप प्रस्ताविकाच्या माध्यमातून गणेश भंडारे गुरुजी यांनी केले.  सोलापूर जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक मा दीपक माळी यांनी आम्ही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, मंडळाचा इतर खर्च कमी करून दानशूर लोकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे असे सांगितले.

या वेळी व्यासपीठावर मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश चवरे, कामती पोलीस स्टेशनचे एपीआय किरण उंदरे, जगन्नाथ पाटील(दादपुर), माजी केंद्रप्रमुख अशोक अवताडे, संतोष सावंत, मोहोळ बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी राठोड, राहुल क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रकाश चवरे, अशोक अवताडे, तानाजी राठोड यांनीही आपी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश माळी यांनी केले तर आभार मंडळाचे खजिनदार विकास शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नितीन माने, उपाध्यक्ष रोहीत माने, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पाटील, दिपकराज माळी, रविराज माळी, मोहन खटके, अंबादास मोटे, सरपंच समीर लिमये, मंगेश माळी, बालाजी आंदोरे, सुशांत शिंदे, राहुल खटके, रामचंद्र शिंदे, गुंडू माळी व इतर सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. अन्नदाता सुखीभव या संकल्पनेसाठी मंगेश माळी, सुनील लिमये, पुरुषोत्तम धावडा, दीपक माळी यांनी आर्थिक योगदान दिले.  

बातम्या आणखी आहेत...