आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांची आतषबाजी रोखण्यासाठी पोलिस सतर्क, ध्वनिमापक यंत्रांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे दोन तास परवानगी दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक आयुक्तालयात पोलिस ठाणेनिहाय ध्वनिमापक यंत्र वाटप करण्यात आले असून जास्त डेसिबल फटाके फोडणाऱ्यांवर मुंबई पोलिस कायदा कलम ३३ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फक्त दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामुळे दिवाळीमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या आतषबाजीत होणारे ध्वनीप्रदूषण आणि हवेतील प्रदूषण रोखण्यात येणार आहे. मध्यरात्री अधिक डेसिबलच्या फटाक्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना अधिक असते. या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी झाली. रात्री दहापर्यंत फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 


पोलिस यंत्रणा सतर्क 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी ध्वनिमापक यंत्रे देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण कायद्यांतर्गत ध्वनिप्रदूषण कायदा प्रमाणे पोलिस ठाणेनिहाय आवाजाचे निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनिमापक यंत्रणेद्वारे रहिवासी परिसरात पोलिसांचे पथक गस्त करणार आहे. 


नागरिकांनी पालन करावे 
न्यायालयाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे. रहिवासी भागात ठरवून दिलेल्या कमी आवाजाचे तसेच शोभेच्या फटक्यांवर उत्सव साजरा करावा जेणेकरुन पोलिसांना कारवाईचा बडगा उगारण्याची गरज पडून नये. अधिक डिसेबल चे फटाके फोडू नये. - विजयकुमार मगर, उपआयुक्त (गुन्हे) 

 

बातम्या आणखी आहेत...