आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर जिल्हा बंदी, कोरेगाव भीमाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून आदेश काढण्यात येणार आहे

पुणे- कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादिवशी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना 4 दिवस पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले. 



मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंडेंसह 163 जणांना जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...