आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा दूध संघ प्रमाणित दूध स्वीकारणार, प्रतिलिटर २० रुपये दर देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- सोलापूर जिल्हा दूध संघाने 'अप्रमाणित' दूध स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा दुधाला प्रतिलिटर २० रुपये दर देण्यात येणार आहे. सोमवारी मोजक्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, शासकीय दराबाबत परिपत्रकात संदिग्धता आहे. त्यामुळे २३ आॅगस्टला पुणे येथे होणाऱ्या बैठकीनंतरच संघाकडून दुधाची बिले दिली जाणार आहेत. संघाने दर जाहीर केल्यानंतरच आपला दर जाहीर करण्याचे धोरण खासगी दूध संस्थांचे आहे. 


शासनाने दूध पावडर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. ३.५ आणि ८.५ निर्देशांक असलेल्या दुधाला २५ रुपये तर ३.२ व ८.३ निर्देशांक असलेल्या दुधाला २४.१० रुपये भाव देणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सरकार पाच रुपये अनुदान देणार आहे. मात्र, या निर्देशांकापेक्षा कमी प्रतीच्या दुधाच्या दराविषयी सरकारच्या परिपत्रकात उल्लेख नाही. 


सोलापूर जिल्हा दूध संघाकडे दररोज ५० हजार लिटर अप्रमाणित दूध संकलित होत आहे. या दुधाला अनुदान मिळणार नसल्याने याला किती दर द्यावा, याबाबत संघाच्या मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. संघाचे संचालक मारुती लवटे, राजेंद्र राजेभोसले, विजय यलपले, शिवाजी नागणे हे चार संचालक आणि ४० दूध संकलक सभासत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक सतीश मुळे यांनी दिली.

 

अप्रमाणित दूध स्वीकारणार अाहोत. त्याबाबतचा अंतिम निर्णय २३ आॅगस्टच्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. सोमवारच्या बैठकीबाबत सर्व संचालकांना कळवले होते.
- सतीश मुळे, व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ  

बातम्या आणखी आहेत...