आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. आफ्रिकेत 55 फूट लांबीच्या व्हेलच्या तोंडावाटे गेला डायव्हर, सहीसलामत बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथच्या समुद्रात रेनर शिंफ (५१) हे डायव्हर ५५ फूट लांबीच्या व्हेल माशाच्या ताेंडावाटे पोटात जाण्याआधीच ते तेथून बाहेरही निघाले. हा अनुभव सांगताना शिंफ म्हणाले, व्हेल हा सस्तन प्राणी आहे. तो श्वास घेण्यासाठी वारंवार पाण्यावर येतो. व्हेलच्या तोंडाशी जाताच मला काळा भाग दिसला. काही तरी घोळ झाल्याचे लक्षात आले. परंतु व्हेल श्वास घेण्यासाठी वर आला आणि तोंड उघडले तेवढ्यात मी तोंडावाटेच बाहेर पडलो. ज्या व्हेलच्या तोंडात अडकलो होतो, तो ब्राइडस जातीचा होता. याचे वजन सुमारे ३० टन व लांबी ५५ फूट इतकी आहे. शिंफ म्हणाले, १५ वर्षांपासून डाइव्ह टूर चालवतो. आताच छायाचित्रकार मित्रासमवेत डायव्हिंगलाच निघालो होतो. व्हेलच्या तोंडात शिरल्यानंतर मला गुदमरल्यासारखे झाले होते. हा अनुभव थरारकच हाेता,पण सुखरूप बाहेर पडलो, असे ते म्हणाले.   


तोंडावाटे निघण्याची घटना कॅमेऱ्यात चित्रित
रेनर यांचा सहकारी छायाचित्रकार हेंज टॉपरजेर यांनी सांगितले, रेनर लहान माशाच्या कळपात जात होते. ते अचानक गायब झाले. त्यानंतर काही तरी गडबड झाल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्या ठिकाणी माझा कॅमेरा रोखला. तेव्हा अचानक एक व्हेल मासा उसळून वर आला व फवारा उडाला.  नंतर पाहिले तर व्हेलच्या तोंडाशी रेनर होते. ही अद्भुत घटना कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. तेथे व्हेलशिवाय अन्य मासेही होते.

बातम्या आणखी आहेत...