आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीनलँडमध्ये गिर्यारोहक जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बर्फाच्या चादरीखाली 90 मी.पर्यंत गेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क- छायाचित्र ग्रीनलँडच्या आइसलँडचे आहे. तेथे जगातील दुसरी सर्वात मोठी बर्फाची चादर (आइसशीट) आहे. तेथे वातावरण बदलाच्या परिणामांची माहिती घेण्यासाठी कॅनडाचे गिर्यारोहक बिल गॅड आपल्या चमूसह गेले. तेथे ते उणे ५० अंश सेल्सियसमध्ये बर्फाच्या गुहेसारख्या तळापर्यंत गेले आणि तेथून चढाई केली. ग्रीनलँडपेक्षा जास्त मोठी आइसशीट अंटार्क्टिकात आहे. तिचे क्षेत्र १.४ कोटी चौ. किमी आहे. तेथे जगातील ९० टक्के बर्फ आहे. तो वितळल्यास समुद्राची पातळी ५८ मीटरने वाढेल आणि किनाऱ्यावरील शहरे बुडण्याचा धोका राहील. विल यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत....

 

पाण्यामुळे झालेल्या विशाल छिद्राजवळ
शरीर काकडू शकत होते, पण हवामान बदलाचे संकट जाणून घेण्यासाठी ग्रीनलँडचे मौलिन निवडले. ते ग्लेशियरमधील विशाल छिद्र आहे. पाणी बर्फातून रस्ता शोधते तेव्हा ते तयार होते. ते सुमारे ९० मीटर खोल आहे. तेच कठीण चढाईसाठी निवडले. या छिद्रात जाण्याचा आणि तेथून चढाईचा हेतू ध्रुवांवर जमलेल्या बर्फावर परिणाम करतात ते आकडे गोळा करणे हा आहे. ग्रीनलँडच्या ८०% भागात बर्फ आहे. तो वितळण्याचा दर काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे होते. -विल गॅड, कॅनडाचे गिर्यारोहक