आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी भूमिका : दरवाजे बंद करू नका, श्वापदांना जेरबंद करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये बिबट्या घुसतो. त्याच्या दहशतीखाली अवघे शहर असते. अशा वेळी काय करायचं? श्वापदं शहरात घुसतात, म्हणून माणसांनाच तुरुंगात बंद करून टाकायचं? माणसांनी खुलेपणाने बाहेर आले पाहिजे. त्यासाठी आधी श्वापदांना जेरबंद केले पाहिजे.  हे बिबट्याबद्दल खरे आहेच, पण त्याहीपेक्षा अिधक खरे आहे माणसाच्या रूपातील श्वापदांबद्दल. बिबट्या मानवी वस्तीत येतो, त्याला असणारी कारणं पर्यावरणीय आहेेत. पण, माणसांच्या वेशातील श्वापदांचं काय करायचं? हैदराबादमध्ये प्रियंका नावाचं एक उमलतं स्वप्न भस्मसात होतं. आपल्या आसपासही हेच घडत असतं. सख्खा बाप मुलीला रोज चिरडत असतो. शाळकरी मुलीवर झुंडीनं अत्याचार हाेत असतो.   आणि, तरीही आपण चर्चा करतो, त्यांनाच बंधनात ठेवण्याची. आपण बोलत असतो, त्यांच्या घरी येण्याच्या वेळेबद्दल. जी श्वापदं हे अत्याचार करतात, त्यांच्याविषयी मात्र आपले मौन असते. गर्भात मुली मारणारी आणि घरात मुली चिरडणारी ही मानसिकता एवढी भयंकर आहे, की बलात्कारानंतरही  ती मुलींनाच अपराधी मानू लागते. पुरुषाचं असं श्वापद होत असताना आपण गप्प कसे बसतो? आता हे मौन सोडावं लागणार आहे. हा प्रश्न समाज म्हणून आपल्याला सोडवावा लागणार आहे. तुम्ही पालक असा वा शिक्षक असा, पोलिस असा वा राजकारणी असा, समग्रपणे या प्रश्नाला भिडावे लागणार आहे. त्यासाठीच आमचे हे अभियान. 

मौन सोडू, चला बोलू

या अभियानात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. ९०४९०६७८८८.

बातम्या आणखी आहेत...