आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचे नाव ऐकून आयुक्तांना बसला धक्का, सगळे हसू लागाले.. दिला नाव बदलण्याचा आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा - आपण सगळेच मोबाईलवर येणाऱ्या मिसकॉलबाबत चर्चा करतो. पण कोटाच्या मुकंदरा हिल्स टायगर रिझर्व्हच्या दामोदरपुरा गावात एका दाम्पत्याने मुलीचे नावच मिस कॉल ठेवले होते. विभागीय आयुक्त केसी वर्मा जेव्हा शाळेत इन्सपेक्शनसाठी गेले तर 6 व्या वर्गातील विद्यार्थिनी मिस कॉल नामचे नाव ऐकूण त्यांना धक्का बसला. त्यामुलीच्या भविष्याचा विचार करून वर्मा यांनी लगेचच एक चांगले पाऊल उचलले आणि आता सर्व रेकॉर्डमध्ये तिचे नाव मुस्कार गुर्जर झाले आहे. गावातील या मुलीला मैत्रिणींनी जेव्हा मुस्कान म्हटले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हसू बरेच काही सांगून जाणारे होते. 


भास्करच्या रिपोर्टनंतर दामोदरपुराच्या शाळेत गेले होते वर्मा 
दैनिक भास्करने 16 जुलैला दामोदरपुरायेथील स्थितीबाबत स्पेशल रिपोर्ट दिला होता. त्यात 91 कुटुंबांच्या या गावात आजवर डॉक्टरने पाऊल ठेवलेले नाही, शाळेला कुलूप आहे अशी परिस्थिती त्यात मांडण्यात आली होती. त्यामुळे वर्मा त्याठिकाणी भेट द्यायला गेले होते. त्यांनी घाटोली सीनियर स्कूलमध्ये मुलींच्या वर्गाला भेट दिली.  त्यावेळी या मुलीने तिचे नाव मिस कॉल असल्याचे सांगितले होते. ते ऐकूण सगळे जोरात हसू लागले. आयुक्त तिच्याशी बोलले तेव्हा तिने हे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर वर्मा यांनी लगेचच मुलीचे नाव बदलण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली. आता तिच्या जन्म प्रमाणपत्रावरही मुस्कान असे नाव देण्यात आले आहे. 


काली बनली काव्य 
दुसरीकडे वर्मा यांनी विज्ञाननगर येथील एका प्रायव्हेट शाळेतील 6 वीतील एका मुलीला नाव विचारले तेव्हा तिने काली नाव असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मुलीला करिश्मा, काजल, कविता, काव्य यापैकी एक नाव ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावर तिने काव्य नाव आवडल्याचे सांगितले. तिच्या नावतही बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...