आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाटाफुटीमुळे राज्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव ओसरला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : अॅड. प्रकाश अांबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित आघाडीने महाराष्ट्रात लाेकसभेच्या ४८ जागा लढवून ७.४२ टक्के मतदान घेतले. साेबतीला एमआयएम असल्याने दलितांसाेबत मुस्लिम मतेही खेचण्यात या आघाडीला यश आले. अाैरंगाबादेत एक खासदारही निवडून आला. आता विधानसभेला मात्र एमआयएमची साथ तुटल्याने वंचितचा प्रभाव कमी झाला आहे. लाेकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम, धनगर, भटके, आदिवासी, बौद्ध मतदारांच्या बेरजेमुळे वंचित आघाडीची चांगली चर्चा झाली. मात्र यानंतर बी.जी. काेळसे, लक्ष्मण मानेंनी अॅड. अांबेडकरांची साथ साेडली. विधानसभेतील जागावाटपात न जमल्याने एमअायएमनेही साथ साेडली. नंतर मग पडळकरांनी रामराम ठोकला. एक तर प्रयोग छोटा, त्यात सातत्य राहण्याएेवजी 'फाटाफूट' वाढत गेली. या पार्श्वभूमीवर 'दिव्य मराठी'ने राज्यात फिरुन वंचितचा प्रभाव जाणून घेतला... त्यात नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळेमध्ये 'वंचित'च्या हाती फार काही लागण्याची शक्यता नसल्याचे दिसते. मुंबईत झोपडपट्टीबहुल भागात लक्षणीय मते मिळतील. कोकणात मात्र फार चांगली परिस्थिती दिसत नाही. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात फायदा मिळू शकताे.बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना जिल्ह्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादेतील 'मध्य'मध्ये अमित भुईगळ यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. एमअायएमशी युती तुटली तरी अॅड. अांबेडकरांनी अाैरंगाबाद पूर्वमध्ये मात्र एमआयएमच्या डाॅ. गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिला अाहे. त्यामुळे येथे भाजपच्या अतुल सावे यांच्याशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काहीसा प्रभाव
पश्चिम महाराष्ट्रात बारामती, तासगाव, जत येथील उमेदवार थोडेफार स्ट्राँग वाटतात. बारामतीत अजित पवार (राष्ट्रवादी) व गाेपीचंद पडळकर (भाजप) यांच्याविराेधात वंचितने धनगर समाजातीलच अविनाश गाेफणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या धनगर मतांचे विभाजन हाेऊ शकते. 'वंचित'ने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार सोशल इंजिनिअरिंग करू शकणारे दिले आहेत. पण तासगाव, जत, पाटण, सोलापूर, नगर येथील उमेदवार मतदारांवर थोडाफार प्रभाव टाकणारे असल्याचे निदर्शनास आले आहे.

उमेदवारांचे प्रमाण
मराठा १८%
मुस्लिम ९%
एससी १७ %
एसटी ९ %
अोबीसी ११ %
धनगर ८ %
भटके १८%
नवबौद्ध १० %

पूर्व विदर्भात प्रतिसाद कमी, पश्चिम विदर्भात मात्र उमेदवारांनी वेधले लक्ष
पूर्व विदर्भात वंचितचा फारसा प्रभाव दिसत नाही. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनाच वंचितने काँग्रेसच्या नाना पटोले व भाजपचे मंत्री परिणय फुकेंविराेधात मैदानात उतरवले आहे. पश्चिम विदर्भातील मलकापूर- डाॅ. नितीन नांदुरकर (कुणबी), बुलडाणा-डाॅ. तेजल काळे (लेवा पाटीदार), चिखली-अशोक सुरडकर, सिंदखेडराजा-सविता मुंडे (वंजारी), खामगाव-शरद वस्तकार (धनगर), बाळापूर- धैर्यवान फुंडकर (मराठा), अकोला पूर्व- हरिभाऊ भदे (धनगर), रिसोड- दिलीप जाधव (बंजारा), धामणगाव रेल्वे- नीलेश विश्वकर्मा (सोनार), बडनेरा- प्रमोद इंगळे (बौद्ध), अमरावती- अलीम पटेल (मुस्लिम), तिवसा- दीपक सरदार अादींनी मतदारांचे लक्ष केंद्रित केले आहे.