आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Khosla's Look Revealed, She Will Appear In Remix Of Falguni Pathak's Song 'Yad Piya Ki Aane Lagi'

फाल्गुनी पाठकचे गाणे 'याद पिया की आने लगी' च्या रीमिक्समध्ये दिसणार आहे दिव्या खोसला, लूक रिव्हील 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 90 च्या दशकात फाल्गुनी पाठकचा म्यूझिक अल्बम खूप प्रसिद्ध झाला होता. ज्यातील गाणे 'याद पिया की आने लगी' चे रीमिक्स 16 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या व्हिडिओमध्ये दिव्या खोसला कुमार दिसणार आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपला नवा लूक रिव्हील केला आहे.  

खूप एक्सायटेड आहे दिव्या... 
दिव्याने लूक शेअर करत लिहिले, 'याद पिया की आने लगी' साठी एकदम नवा लूक आणि हा मला खूप पसंत आहे. आशा आहे की, तुम्हीदेखील या नव्या नवरीला पसंत कराल. गाणे 16 नोव्हेंबरला येत आहे. या गाण्याबद्दल दिव्या खूप एक्सायटेड आहे. हे गाणे तनिष्क बागचीने रीक्रिएट केले आहे आणि नेहा कक्कडने याला आवाज दिला आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन विनय सप्रू आणि राधिका रावने केले आहे.  

90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आहे फाल्गुनी... 
55 वर्षांची सिंगर फाल्गुनीचे गाणे 'याद पिया की आने लगी' बद्दल बोलायचे तर ते हे तिचे डेब्यू सॉन्ग होते. ज्यामध्ये रिया सेन, रिचा पलोद आणि किरण जनजानीने काम केले होते. दिव्याने आपल्या करिअरची सुरुवात फाल्गुनी पाठकचेच व्हिडिओ सॉन्ग 'अईयो रामा' ने केली होती. याव्यतिरिक्त ती 'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम सोबत दिसली आहे. 

बातम्या आणखी आहेत...