आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अक्षरा’ वाचनीय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’त दर बुधवारी ‘अक्षरा’ हे वाचनीय पान असते. यात वाचन संस्कृतीसंबंधी आगळीवेगळी माहिती वाचावयास मिळते. आपली वाचन संस्कृती जपण्याचे प्रयत्न फारच चांगले आहेत. हे कार्य म्हणजे एक समाजप्रबोधनच आहे. या माध्यमातून आम्हाला एक चांगला मार्ग मिळाला आहे. आमचे ब्रह्मानंद वाचनालय औरंगाबाद शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर पिंप्री राजा येथे आहे. या वाचनालयात जवळपास 14 हजार ग्रंथसंपदा आहे. वाचनाची गोडी लागवी यासाठी ग्रंथप्रदर्शन, भित्तिपत्रक प्रदर्शन, ग्रंथांची माहिती, विविध स्पर्धा, वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र आपल्या या ‘अक्षरा’मुळे ज्ञानात आणखीच भर पडत आहे.