आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्येचा इव्हेंट (अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच साऱ्या राजकीय पक्षांना लाेकसभा निवडणुकीचे वेध लागले अाहेत. या विधानसभा निकालांवरून देशाचा कल स्पष्ट हाेणार या गृहितात बऱ्यापैकी तथ्य अाहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी अाणि काँग्रेसने  सातत्य राखून अाघाडीसाठी गांभीर्याने काम सुरू केले. त्यामुळे भाजप, शिवसेनेवर देखील युतीसाठी दबाव वाढला अाहे.

 

एकूणच बदलता राजकीय प्रवाह, अलिकडच्या काळातील पाेटनिवडणुकांनी दिलेला काैल अाणि भाजपविराेधात एकवटत असलेले विराेधी पक्ष या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात युतीला पर्याय नाही, इतपत वातावरण तयार झाले. त्याचवेळी हिंदुत्व अाणि अयाेध्येतील राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने हाती घेतला. यामुळे संभ्रमात भर पडली, हे निश्चित. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माेहन भागवत यांनी सकाळी राम मंदिराचा मुद्दा मांडला, तर उद्धव ठाकरेंनी सायंकाळी शिवतिर्थावरून ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’चा नारा देत ‘चलाे अयाेध्या’ची हाक दिली. हा याेगायाेग नव्हता. यामागे अनेक छुपे अजेंडे अाणि तथ्य दडलेले अाहेत. नागपुरात माेहन भागवत अाणि उद्धव ठाकरे यांच्यात जे खलबत झाले त्याचाच हा भाग हाेता.

 

शिवसेनेसाठी ही इव्हेंट अजूनही एक जाेखीमच अाहे. परंतु, अयाेध्येत शाखा स्थापनेच्या निमित्ताने केलेले सीमाेल्लंघन, राष्ट्रीय राजकारणात पक्षाची ताकद दाखवून देण्यात उद्धव ठाकरेंना मिळालेले यश पाहून शिवसैनिकांप्रमाणेच संघ परिवार मनाेमन सुखावला असेल. जी स्वप्नं दाखवून केंद्रात सत्ता मिळवली, ती साकार करता न अाल्यामुळे भाजप चिंताक्रांत अाहे. विशेषत: केंद्र अाणि उत्तरप्रदेशात स्वपक्षाचे सरकार असताना राम मंदिराचा तिढा सुटत नाही याची सल भाजप, संघाला अधिक असणे स्वाभाविक अाहे. नेमका हाच मुद्दा हायजॅक करून शिवसेनेने अयाेध्येला धडक देत दाेन गाेष्टी साधल्या.

 

एक म्हणजे भाजपच्या गाेटात खळबळ उडवली, दुसरे संघ परिवाराशी थेट जवळीक साधण्यात यश मिळवले. तात्पर्य, भाजपची काेंडी करण्यासाेबत स्वत:ची बार्गेनिंग पाॅवर वाढवण्याच्या इराद्याने अयाेध्येचा इव्हेंट शिवसेनेने केला असला तरी संघटना म्हणून ताे पथ्यावर पडेल. परंतु राम मंदिराच्या मुद्यामुळे शिवसेनेचे नुकसान देखील हाेऊ शकते. राज्यात सर्वत्र दुष्काळ अाहे, लाेकसभा निवडणुकीपर्यंत त्याची तीव्रता अधिक वाढणार अाहे. त्यामुळे हाेरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदत कार्याला प्राधान्य न देता राम मंदिराचा मुद्दा लावून धरला तर ग्रामीण भागात शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकुणात राजकीय पक्ष म्हणून भाजपच खरा लाभार्थी ठरण्याची शक्यता अधिक अाहे.

 

भलेही शिवसेनेने तवा गरम केला असला तरी त्यावर पाेळी टाकायची की नाही; याचा निर्णय माेहन भागवत, नरेंद्र माेदी अाणि अमित शहा हेच घेतील. अर्थात भाजपने अध्यादेश काढला तर राम मंदिर निर्मितीचा मार्ग खुला हाेईल अाणि संघ परिवार याचे श्रेय लाटेल. त्यावेळी शिवसेना भाजपच्या प्रचार तंत्राला ताेंड देवू शकेल का? हा मुद्दा तितकाच महत्वाचा अाहे.
 भाजप हिंदुत्ववादी पक्ष अाहे, हा पक्ष राम मंदिराचा मुद्दा हाती घेणार असेल तर शिवसेना-भाजपची युती हाेऊ शकते; हा मनाेहर जाेशी यांनी दिलेला संकेत अाणि उद्धव ठाकरे यांचे अयाेध्येला जाणे युतीसाठी पाेषक अाहे, या मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानाचा मतितार्थ महाराष्ट्रात युतीला राजकीय समृध्दी मिळवून देणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा ठरताे. मध्यमवर्गीय मतदारांना खेचण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्याने भाजपला नेहमीच साथ दिली.

 

शहरी भागात भाजपचा मतदार असलेल्या ठिकाणी शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर भगवा फडकावला हाेता. हे लक्षात घेता कदाचित भाजपशी युती हाेऊ शकली नाही, तर राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेचा विचार हाेऊ शकेल हे गृहित धरून अाणि मरगळलेल्या शिवसैनिकांना कार्यक्रम देण्याची अायती संधी उद्धव ठाकरेंनी साधली. ‘अच्छे दिन’चे स्वप्नरंजन विरते न विरते ताेच ‘सबका साथ, सबका विकास’ची भाषा बदलत गेली. त्यामुळे एेन निवडणुकीच्या ताेंडावर संघाला अयाेध्येतील राम मंदिराची अाठवण हाेणे साहजिकच हाेते. अयाेध्येच्या मुद्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापलेले असताना पंतप्रधान नरेंद्र माेदींनी राम मंदिर उभारणीच्या विलंबास काँग्रेस  जबाबदार असल्याचे स्पष्ट करीत निशाणा साधला. परंतु, एवढ्यावर संघाचे समाधान हाेणे शक्य नव्हते.

 

मंदिर उभारणीतील राजकीय विराेध माेडून काढण्यासाठी कायदा करा, असा संकेत सरसंघचालक भागवत यांनी दिला. कदाचित, लाेकसभेत अध्यादेश पारित हाेऊ शकेल मात्र राज्यसभेत पुरेशा संख्याबळाअभावी ताे मंजूर हाेऊ शकत नाही. याची कल्पना भागवतांना नसेल असे अजिबात नाही. मात्र केंद्र सरकारवरील दबाव वाढवण्याचा संघाचा इरादा यातून स्पष्ट हाेताे. एकुणात शिवसेना, विहिंप, भाजप अाणि संघाच्या पाठाेपाठ कांॅग्रेसला राम नामाचा महिमा कळला अाहे. निवडणूक जवळ येईल तसे अन्य पक्षही राम नामाचा गजर करतील. अास्थेपेक्षा निवडणुकीच्या राजकारणाचा विषय ठरलेल्या या राम संकिर्तनाकडे एक इव्हेंट म्हणून पाहणेच तूर्तास याेग्य ठरेल.

बातम्या आणखी आहेत...