आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी' दिवाळी अंकाचे दिल्लीत उत्साहात प्रकाशन; मराठी पत्रकारितेला वैश्विक भान हवे -मान्यवरांचा सूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिव्य मराठी' दिवाळी अंकाचे प्रकाशन दिल्लीत झाले. या प्रसंगी डावीकडून तरुण नांगिया,  प्रा. अभिषेक भोसले, आशिष दीक्षित, दयानंद कांबळे, ओम गौड, संजय आवटे - Divya Marathi
'दिव्य मराठी' दिवाळी अंकाचे प्रकाशन दिल्लीत झाले. या प्रसंगी डावीकडून तरुण नांगिया, प्रा. अभिषेक भोसले, आशिष दीक्षित, दयानंद कांबळे, ओम गौड, संजय आवटे

नवी दिल्ली - 'दिव्य मराठी'ने जपलेले वैश्विक भान अधिक महत्त्वाचे आहे, असा सूर सर्व वक्त्यांचा होता. 'दिव्य मराठी'च्या दिवाळी अंकाचे आज दिल्लीत दिमाखदार प्रकाशन झाले, त्या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी 'दिव्य मराठी'च्या पत्रकारितेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.  त्याचप्रमाणे, पत्रकारितेच्या बदलणा-या स्वरूपाविषयी मांडणी केली.

'बीबीसी मराठी"चे संपादक आशिष दीक्षित, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, माध्यम अभ्यासक प्रा. अभिषेक भोसले, न्यूज एक्सचे कन्सल्टिंग एडिटर तरूण नांगिया, 'भास्कर'चे नॅशनल satelite एडिटर ओम गौड या प्रसंगी उपस्थित होते. 'दिव्य मराठी'चे राज्य संपादक संजय आवटे यांनी प्रास्ताविक केले.

दीक्षित म्हणाले, हा दिवाळी अंक महाराष्ट्राचा नाही. त्याला वैश्विक भान आहे. मानवी चेहरा आहे. प्रा. भोसले यांनी 'रिपोर्ताज'साठी 'दिव्य मराठी' घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल आनंद व्यक्त केला. हा अवकाश दिला जाणे अपवादात्मक असल्याचे त्यांनी नोंदवले. तरूण नांगिया यांनी महाराष्ट्राचे वेगळेपण 'दिव्य मराठी'च्या दिवाळी अंकात दिसत असल्याचे सांगितले. दयानंद कांबळे म्हणाले, पत्रकारितेचा खरा अर्थ समजला, तरच सामान्य माणसाला आवाज मिळू शकतो. माध्यमांचे स्वरुप बदलले, तरी मूल्यव्यवस्था बदलत नाही. सामान्यांचा आवाज हेच पत्रकारितेचे खरे स्वरुप असू शकते.