आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Marathi Impact | The Names Of The People's Representatives In The Navapur Election Office Were Covered

नवापूर निवडणूक कार्यालयातील लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक झाकले; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'दिव्य मराठी'च्या बातमीची दखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर - राज्यात आचारसंहिता लागू झाली असताना देखील नंदुरबारमधील नवापूर तहसील कार्यालयात पहिल्याच दिवशी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडे राहिल्याची बामती दिव्य मराठीने प्रसिद्ध केली होती.  नंदुरबार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत तहसीलदारांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नवापूर निवडणूक कार्यालयातील फलक झाकण्यात आले. 
 
आचारसंहितेची अंमलबजावणी केली जात असलेल्या प्रशासकीय कार्यालयातच आचारसंहितेचे पालन झाले नाही. याठिकाणी राजकीय लोकांचे फलक सुस्थितीत तर निवडणूक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्य मराठीच्या बातमीची दखल घेत लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक झाकण्यास सांगितले. तर अस्ताव्यस्त असलेले निवडणूक आयोगाच्या जाहिरातीचे बॅनर तेथून हटवण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...