आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'चा पुढाकार बलशाली महाराष्ट्रासाठी गणरायांच्या साक्षीने करू मतदानाची प्रतिज्ञा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यंदा गणेशोत्सवानंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका सर्वाधिक औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवात राजकीय फड रंगणार यात शंका नाही. मात्र, ज्या मतदारांच्या बळावर या निवडणुका होतात त्यांनीही सूज्ञ नागरिक म्हणून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठी 'दिव्य मराठी' शहरातील गणेश मंडळांच्या माध्यमातून 'मतदानाची प्रतिज्ञा' करण्याचे आवाहन करत आहे.  गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळाने आरतीसोबतच मतदानाची प्रतिज्ञा घ्यावी. यामुळे मतदानाचा हक्क बजावण्याची चळवळ समाजात रुजेल. राजकारणात केंद्रस्थानी मतदार आहे. मतदाराने हक्क बजावला तरच लोकशाही नांदेल. म्हणून हजारो नागरिक गणरायाच्या साक्षीने मतदान करण्याची प्रतिज्ञा करतील, अशा उपक्रमात मंडाळांनी सहभागी व्हायला हवे.  आपल्या मंडळाच्या सामूहिक प्रतिज्ञेचे छायाचित्र व थोडक्यात माहिती आमच्याकडे पाठवा. खूप मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असतील, तर आम्ही आमचा छायाचित्रकार आवर्जून पाठवू. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला सामजिक बांधिलकीची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचे पाईक होण्यासाठी हे एक छोटेसे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...