आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Jeevanmarg Article About Satisfaction

चंचल वृत्तीचा त्याग करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिश्रम आणि संपत्तीचे जुने नाते आहे. भाग्य आणि संपत्तीचा जवळचा संबंध आहे. या तिन्ही गोष्टींचा संबंध समाधानाशी जोडला गेला पाहिजे. संपत्ती मिळो अथवा ना मिळो, संतुष्ट असावे. अनेकदा अल्पसंतुष्ट राहण्याच्या वृत्तीमुळे काही लोकांचे नुकसानही होते. तसेही वागू नये. संपत्ती कमावलीच पाहिजे. पुरातन काळात अनेक लोकांनी धन कमावण्यासाठी विविध प्रयोग करून पाहिले. भर्तृहरी सांगत असत - धनाच्या लालसेने लोक पृथ्वीच्या तळापर्यंत खोदकाम करण्याच्या तयारीत असत. मोठमोठे डोंगर खोदून पाहिले, समुद्राच्या तळाचाही थांग घेतला. राजाला खुश करण्याची कोणतीही संधी सोडत नसत. स्मशानात जाऊन रात्र-रात्र घालवत पूजापाठ किंवा मंत्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत. तरीही लक्ष्मी प्राप्त होण्याचा भरवसा नसायचा. आजच्या युगात तर नवे हातखंडे वापरण्यात येत आहेत. यासाठीच संतुष्टी कशी मिळवायची याचा ताळमेळ लावला पाहिजे. आपल्याकडे ऋषी-मुनींनी धनपर्वाचा दिवाळीशी संबंध जोडला आहे. हेच दिवस संपत्ती मिळवण्याचे शुभदिन आहेत. या पाच-सहा दिवसांतच लक्ष्मी कशी प्राप्त होईल, याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी प्रामाणिकपणा, संतुष्टता आणि परोपकाराशी जोडण्याची वृत्ती लागते. समाज या मंगलप्रसंगी एकत्र येत असतो. तुमच्याकडे संपत्ती असेल तर उदार मन ठेवून इतरांसाठी काही करता येईल का, याचाही विचार करावा. हा विचारच एका पर्वाचा आरंभ आहे, परंतु संपत्ती आपल्यासोबत दुर्गुणही घेऊन येत असते. पैसा जर खिशात खुळखुळत असेल, तर काहीतरी वाईट मार्गाला जाण्यासाठी तो उद्युक्त करत असतो. लक्ष्मीची वृत्ती चंचल नाही, परंतु ती आपल्यामध्ये दिसून येते. श्रीमंत-गरिबांची वृत्ती सारखीच, परंतु यात लक्ष्मीची चंचलता आली की श्रीमंत उधळा, तर गरीब गुन्हेगार बनण्यास वेळ लागत नाही.