आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही घरे बदलतो, पण बदलणाऱ्या भाषेला घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगभरात जिथे भाषेसोबत प्रयोग झाले, बदलत्या काळासोबत भाषा प्रवाही राहिल्या, त्या भाषा टिकल्या, वाढल्या, उलट ज्यांनी बदलणं नाकारलं त्या लुप्त झाल्या याकडे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार स्वानंद किरकिरे यांनी लक्ष्य वेधले. आपण घरं बदलतो, राहणीमान बदलतो, पण भाषेला प्रवाहसोबत बदलू देत नाही, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली. दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलमधील 'भाषा एक खोज' या सत्रात ते बोलत होते. दैनिक भास्कर डिजिटलचे संपादक अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

'औरंगाबादकरांना नमस्कार...'  या शब्दात किरकिरे यांनी त्यांच्या संवादाला सुरुवात केली. चित्रपट गीतांनी भाषेला प्रवाही ठेवले, बोली भाषेत जे बदलले ते चित्रपटाच्या भाषेतही बदलले असल्याचे त्यांनी उदाहरणांसह मांडले. व्हॅक्युम क्लीनर विक्रेता ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार, संगीतकार यांनी 'भाषा एक खोज' या विषयावर त्यांच्या कविता, त्यांची गाणी या निमित्ताने शब्द, भाषा यावर संवाद साधला. 'हजारो ख्वाईशे' मधील 'बावरा मन..' या गण्यापासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधील 'बंदे में है दम...'द्वारे भाईच्या शब्दातील गांधीजी, 'थ्री यिडीएट्स'मधील 'ऑल इज वेल' ही कॉलेज युवकांची भाषा यामागील प्रक्रिया त्यांनी सांगितली. पंधरा दिवस झगडल्यावर ते शब्द सापडल्याच त्यांनी सांगितलं. 

 

चित्रपट गीतांसाठी दिग्दर्शकांकडून होणाऱ्या 'हूक लाईन'च्या मागणीविषयी बोलताना ते म्हणाले, 'कला असली तरी शेवटी चित्रपट हा व्यवसाय आहे आणि तो यशस्वी होण्यासाठी गाण्यांची हूक लाईन हा सध्या आग्रहाचं मुद्दा बनला आहे. पण त्यात गैर काही नाही. गीतकाराचे विचार हीच हूक लाईन असते अनेकदा. मात्र लोकांना मूर्ख बनवण्यासाठी जे केलं जातं ते गैर आहे', अशा शब्दांत त्यांनी विचार मांडले. त्यायासाठी पु. ल. देशपांडे यांच्या नाट्यविषयक विधानाचा आधार घेतला. मात्र, आपल्याला हूक लाईन मागणारे नाही तर कथेनुसार गाणी मागणारे दिगदर्शक मिळाले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

 

आपल्या देशात चित्रपट गीत लेखनाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही, चित्रपटांच्या मागणीनुसार गीतकार, कवी त्यांच्या प्रतिभेनुसार गीते लिहून देतात मात्र ते भविष्यात अशी संस्था असावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 


'एन एस डी'चे सौंदर्य आणि जीवनाची 'एन एस डी'

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी, त्यांच्या विभिन्न संस्कृती, विचार, दृष्टिकोन, त्यातून मिळालेली विभिन्न शिकवण, तेथील वातावरण हेच आपल्या कलेचं उगमस्थान असल्याचं ते म्हणाले. अशी सरकारी संस्था असणं हे आपल्या देशाच सौंदर्य असल्याचं त्यांनी मांडल. एन एस डीने आपल्याला अनेक कलाकार दिले, अर्थात त्यांना तेथे जाता आलं नाही, पण जीवनाच्या एन एस डी मधून शिकणारेही असंख्य कलाकार आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले. या क्षेत्रात शिकू इच्छिणाऱ्या तरुणांनी मनातील भीती घालवून प्रयत्न करणं गरजेचं आहे असे ते म्हणाले.

 

किरकिरे म्हणाले,

- जगण्याशी जोडलेली कला सच्ची
- भाषेवर प्रेम करतो, पण ती बदलू देत नाही
- प्रवाही भाषा टिकल्या, बाकीच्या संपल्या
- बावरा मन... माझ्या जगण्याच प्रतिबिंब
- बंदे में है दम... मुन्नाभाईच्या भाषेचं आव्हान
- ऑल इज वेल.. कॉलेज तरुणांची भाषा 
- रागाने परिस्थिती बदलत नाही हे कळाले
- स्वतःला बदलण्याची सुरवात केली
- इंटरनेटवरील एक व्यंगचित्र बघून 'मुर्गी क्या जाने' हे गाणे त्यांना सुचले

 

या गाण्यांनी आणली बहार...

औरंगाबादकरांच्या फर्माईशीवर किरकीरेंनी ही गाणी गाऊन या संवाद सत्रात बहार आणली...
- ओरी चिरय्या..
- बावरा मन...
- वो किसीं रेल सी ...
- बेहेती हवा से था वो...

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...