आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: पीयूष मिश्रा, स्वानंद किरकिरे, विश्वास पाटील यांचाही सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गोळीबंद आवाजात जीवनावर परखड भाष्य करणारे लोकप्रिय कवी, अभिनेते पीयूष मिश्रा, पानिपतच्या लढाईला जिवंत करणारे विश्वास पाटील, भाषेवर अमोघ प्रभुत्व असलेले स्वानंद किरकिरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या कलांचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी 'दिव्य मराठी' आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी (२५ नोव्हेंबर) रसिकांना लाभणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत हा महोत्सव रंगणार आहे.

 

२५ नोव्हेंबर रोजी सभागृहनिहाय होणारे कार्यक्रम असे : पु. ल. देशपांडे सभागृह : सकाळी ११ वाजता : आरंभ है प्रचंड हा पीयूष मिश्रा यांचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम सादर होईल. सूत्रसंचालन अनुज खरे करणार आहेत. १२.३० वाजता कथाकथन : भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयावर विनीत वाजपेयी बोलतील. संचालन विकास सिंग करणार आहेत. दुपारी २ वाजता कहाणी अमर चित्रकथेची या विषयावर रीना पुरी, साबियो मैनक्रहन्स यांच्याशी विकास सिंग संवाद साधतील. ३.३० वाजता प्रख्यात भाषा तज्ज्ञ, कवी स्वानंद किरकिरे यांच्याशी भाषा एक खोज या विषयावर लक्ष्मी पंत संवाद साधणार आहेत. ४.३० वाजता काव्य, पत्रकारिता आणि सिनेमा : कॉकटेल फॉर सक्सेस या विषयावर आलोक श्रीवास्तव बोलतील. संचालन अनुज खरे करणार आहेत. 


डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह : सकाळी ११ वाजता पालकत्व एक कला या विषयावर प्रिया सचान बोलणार आहेत. १२.३० वाजता लोकसाहित्याचा आजवरचा प्रवास आणि भवितव्य या विषयावर डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्याशी प्रशांत पवार संवाद साधतील. २ वाजता सक्सेस मंत्रा ऑफ फूड ब्लॉगर याविषयी अर्चना दोशी बोलतील. ३.३० वाजता पानिपतची लढाई या विषयावर विश्वास पाटील यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. ४.३० वाजता होणाऱ्या कवी संमेलनात वैभव जोशी, दासू वैद्य, अनुराधा पाटील, इंद्रजित भालेराव, केशव खटिंग यांचा सहभाग असेल. संचालन श्रीकांत उमरीकर, मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.

 
बशर नवाज सभागृह : सकाळी ११ वाजता परेश चिटणीस अक्षर स्वभाव सांगते या विषयावर रंजक माहिती देतील. १२.३० वाजता मिलिंद कुलकर्णी यांची निवेदनाची कार्यशाळा होणार आहे. २ वाजता बाळासाहेब परीट, हिंमतराव पाटील यांच्या खुमासदार कथा ऐकण्याची संधी आहे. ३.३० वाजता बब्रुवान रुद्रकंठावार यांच्या साहित्याचे अभिवाचन पद्मनाभ पाठक, सतीश जाधव, सुजाता पाठक करतील. ४.३० वाजता राम आणि गोपाल जाघम यांचे लोहतरंग वादन होणार आहे. ५.३० वाजता अमेय दक्षिणदास यांची नाट्यलेखन विषयावर कार्यशाळा होणार आहे. 


पत्रलेखन स्पर्धेत ११, १२ वी व महाविद्यालयीन युवक खुल्या गटात 
आप्त, मित्रांविषयी भावनिक ओलावा व्यक्त करणारी पत्रे तर आजकाल फार क्वचित पाहण्यास मिळतात. अस्तंगत होत चाललेल्या या लेखनकलेला अरविंद जगताप यांनी अलीकडील काळात नवे रूप दिले. 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या टीव्ही मालिकेत त्यांनी मान्यवरांना लिहिलेली पत्रे प्रचंड लोकप्रिय झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या भावभावना लाखो रसिकांच्या हृदयात कल्लोळ निर्माण करून गेल्या. त्यामुळे यापुढील काळात अधिकाधिक लोकांनी पत्रलेखनाकडे वळावे, असा उद्देश ठेवून दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
असा घेता येईल सहभाग : आपले पत्र मराठी किंवा हिंदीत ३०० शब्दांच्या मर्यादेत लिहा. हस्ताक्षर सर्वांना वाचता येईल असे असेल, याची काळजी घ्यावी. पत्राच्या शेवटी तुमचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक नोंदवा. पत्र लिहून एका पाकिटात टाका. पाकिटावर दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल, पत्रलेखन स्पर्धा असा उल्लेख करा आणि २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पाकीट दिव्य मराठी कार्यालय, मोतीवाला कॉम्प्लेक्स, सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ, जालना रोड येथे पोहोचते करा.

 

दिव्य मराठी कार्यालयात कार्यक्रमांचे पासेस उपलब्ध 

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणारे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांचे व्याख्यान, त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता साबरी ब्रदर्स यांचा कव्वालीचा कार्यक्रम, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा आणि २५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या पियूष मिश्रा यांच्या बल्लीमारन या कार्यक्रमांचे पासेस दिव्य मराठी कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ते रसिकांना घेता येतील. 

 

पत्रलेखन स्पर्धेत ११, १२ वी व महाविद्यालयीन युवक खुल्या गटात 
दिव्य मराठीतर्फे २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सरस्वती भुवन परिसरात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आई-वडिलांना पत्र लिहा आणि जिंका बक्षिसे' स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. दोन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना प्रख्यात लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. अकरावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी खुल्या गटात सहभागी होवू शकतील. 


मोबाइलच्या दुनियेत पत्रलेखन दुर्मिळ होत चालले आहे. कुटुंबीय, आप्त, मित्रांविषयी भावनिक ओलावा व्यक्त करणारी पत्रे तर आजकाल फार क्वचित पाहण्यास मिळतात. अस्तंगत होत चाललेल्या या लेखनकलेला अरविंद जगताप यांनी अलीकडील काळात नवे रूप दिले. 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या टीव्ही मालिकेत त्यांनी मान्यवरांना लिहिलेली पत्रे प्रचंड लोकप्रिय झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या भावभावना लाखो रसिकांच्या हृदयात कल्लोळ निर्माण करून गेल्या. त्यामुळे यापुढील काळात अधिकाधिक लोकांनी पत्रलेखनाकडे वळावे, असा उद्देश ठेवून दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

असा घेता येईल सहभाग : आपले पत्र मराठी किंवा हिंदीत ३०० शब्दांच्या मर्यादेत लिहा. हस्ताक्षर सर्वांना वाचता येईल असे असेल, याची काळजी घ्यावी. पत्राच्या शेवटी तुमचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक नोंदवा. पत्र लिहून एका पाकिटात टाका. पाकिटावर दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल, पत्रलेखन स्पर्धा असा उल्लेख करा आणि २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पाकीट दिव्य मराठी कार्यालय, मोतीवाला कॉम्प्लेक्स, सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ, जालना रोड येथे पोहोचते करा.

 

दोन गटात होईल स्पर्धा 

ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावी आणि त्यापुढील सर्वांसाठी अशा दोन गटांत आहे. दोन्ही गटांसाठी 'आई किंवा वडिलांना पत्र' असा विषय आहे. 


अशी आहेत बक्षिसे 
प्रत्येक गटातून तीन असे एकूण सहा सर्वोत्तम पत्रलेखक निवडले जातील. त्यांना अनुक्रमे २१००, १५००, ११०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...