आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: झी मराठीच्या कलावंतांसोबत आज धमाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दैनिक दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी (२४ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता वारसा स्वतंत्र विचारांचा, उत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा धमाल कार्यक्रम होणार आहे. यात झी मराठीचे विख्यात कलावंत सादरीकरण करणार आहेत. दीप्ती भागवत, अधोक्षज कराडे, सारेगमपचा विजेता राहुल सक्सेना, विख्यात गायिका अमृता नातू, संभाजी मालिकेतील रानू अक्काची भूमिका साकारणारी अश्विनी महंगडे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू भोगे, डान्स महाराष्ट्र डान्सची विजेती पूजा कदम, चैतन्य कुलकर्णी, श्रावणी महाजन तसेच झीचा वाद्यवृंद सादरीकरण करतील. 


 अाज सादर हाेणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक.

 

पु. ल. देशपांडे सभागृह 
- सकाळी ११ वाजता : सांगीतिक अभ्यासक्रमाच्या शास्त्रशुद्ध बांधणीचे स्वरूप आणि आवश्यकता या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात गायक अवधूत गुप्ते, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेते जितेंद्र जोशी, कौशल इनामदार, डॉ. शीतल मोरे सहभागी होतील. सूत्रसंचालन स्वप्निल बांदोडकर, डॉ. गौतमी दिघे करतील. 
- १२.३० वाजता : ‘साहित्य संमेलनाचे बदलते स्वरूप’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले पाटील सहभागी होतील. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे सूत्रसंचालन करणार आहेत. 
- २ वाजता : ‘शिल्पकला, चित्रकला : साहित्य भावाविष्कार’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, चित्रकार मिलिंद जोशी यांचा सहभाग  असेल. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.
- ३.३० वाजता : ‘द वेट लॉस तमाशा’ या विषयावर प्रख्यात लेखिका ऋजुता दिवेकर यांच्याशी राकेश दवाणी बोलणार आहेत. 
- ४.३० वाजता : ‘कला कथाकथनाची’ या विषयावर प्रख्यात कथाकथनकार ख्रिस्तोफर सी डॉवेल यांच्याशी विकास सिंग संवाद साधतील. 
- ५.३० वाजता : प्रख्यात लेखक, पत्रकार हुसेन झैदी यांच्याशी   अभिजित कुलकर्णी ‘डोंगरी ते दुबई’ या पुस्तकाविषयी बोलतील. 

 

डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह
- सकाळी ११ वाजता : ‘गुरू-शिष्य परंपरा : काल, आज आणि उद्या’ या विषयावर पं. नाथराव नेरळकर, डॉ. पार्वती दत्ता भूमिका मांडतील. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार करणार आहेत. 
- १२.३० वाजता : ‘मराठी चित्रपटांचे भवितव्य’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन अजय कुलकर्णी करणार आहेत.
- दुपारी २ वाजता : प्रख्यात अभिनेते जितेंद्र जोशी यांना ‘मंत्र ऑनलाइन कंटेंटच्या यशाचा’ या विषयावर दीप्ती राऊत बोलते करतील.
- दुपारी ३.३० वाजता : ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातील कलावंत प्रसाद कांबळी, प्राजक्ता देशमुख, प्रफुल्ल दीक्षित, शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, आनंद ओक यांच्याशी पीयूष नाशिककर संवाद साधतील. 
- ४.३० वाजता :  लेखक अरविंद जगताप ‘ताकद एका पत्राची’ या विषयावर बोलतील. अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन काटे सूत्रसंचालन करतील. 
- ५.३० वाजता : ‘ऑडिओ बुक : काळाची गरज’ यावर चर्चासत्र होईल. मनोज तुळपुळे सूत्रसंचालन असून, यात साकेत भांड, प्रसाद मिरासदार, संकीर्त गुमास्ते यांचा सहभाग असेल.  

 

बशर नवाज सभागृह
-सकाळी ११ वाजता : ‘अक्षरातून उलगडले साहित्य’ या विषयावर अच्युत पालव यांची कार्यशाळा होईल. 
- १२ वाजता : संकर्षण कऱ्हाडे ‘कला पुस्तक वाचनाची’ या विषयावर भूमिका मांडतील. त्यांच्याशी अंजली धानोरकर संवाद साधणार आहेत. 
- दुपारी २ वाजता : ‘सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या तुलनेत मराठी नाटकाचे बदलते स्वरूप’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. अजित दळवी, प्रा. डॉ. दिलीप घारे आणि राजकुमार तांगडे यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन श्रीकांत सराफ करणार आहेत.
- दुपारी ३.३० वाजता :  ‘आयुर्वेदातील साहित्य’ या विषयावर डॉ. विक्रांत जाधव बोलतील. त्यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. 
- ४.३० वाजता : ‘शब्द-उच्चार, सूर संवाद’ या विषयावर मिलिंद जोशी बोलणार असून संचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. 
- सायंकाळी ५.३० वाजता : ‘साहित्य, सोशल मीडिया आणि आपण’ या विषयावर विकास एडके भूमिका मांडतील. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार करणार आहेत.  

 

> पत्रलेखन स्पर्धेचा निकाल दुपारी ३:३० वाजता जाहीर करण्यात येईल.
> सर्व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...