आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीचा खजिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक दिव्य मराठीमध्ये बातम्यांसोबत प्रकाशित होणारा माहितीचा खजिना हा शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे. दर आठवड्यात शनिवारी प्रकाशित होणार्‍या पीपल प्लेझर या पानावर सध्या चर्चेत असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती मिळते. यापूर्वी चर्चेतील व्यक्तींबद्दल वाचायचे झाल्यास साप्ताहिके चाळावी लागत असत. मात्र, हे पान सुरू झाल्यापासून दैनिकातही सहज माहिती उपलब्ध होत आहे. विशेषत: स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा मजकूर मार्गदर्शक ठरत आहे. आम्ही विद्यार्थी मित्र-मैत्रिणींमध्ये या माहितीची देवाण-घेवाण करतो. चर्चा करतो. शनिवारच्या अंकात येणारे हे पान मी नेहमी जपून ठेवतो. माझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांनीदेखील या पानाचा संग्रह करून ठेवावा आणि स्पर्धा परीक्षांच्या वेळी तो नक्की वाचावा.