आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी’चा रातरागिणी नाइट वॉक ग्रामीण भागातही पोहोचावा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बीड - दैनिक दिव्य मराठीने “मौन सोडू, चला बाेलू’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख २९ शहरांतून राबवलेल्या रातरागिणीचा नाइट वॉक या उपक्रमाची बीड येथील दैनिक चंपावती पत्रने अग्रलेखातून दखल घेतली आहे. चंपावती पत्र हे दैनिक बीडमध्ये मागील ५४ वर्षांपासून प्रकाशित होत आहे. या दैनिकाने आपल्या अग्रलेखातून दिव्य मराठीचे कौतुक करत या उपक्रमाचा प्रभाव ग्रामीण भागातील स्त्रियांपर्यंत कसा पोहोचणार, शहरी भागात शिक्षित महिलांचे प्रश्न वेगळे आहेत, ते बऱ्याचदा सेवा क्षेत्राशी निगडित असू शकतात, परंतु ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना समाजकंटकाच्या त्रासापेक्षा कौटुंिबक चालीरीतीच्या त्रासांना सातत्याने तोंड द्यावे लागते.  एखाद्या वेळी सासरची आर्थिक स्थिती बरी नसेल तर मग त्या कुटुंबातील नवविवाहितांच्या अडचणी याचा विचारच करायला नको. तेव्हा शहरी भागातील रातरागिणी नाइट वॉक हा जो उपक्रम दिव्य मराठीने राबवला आहे तो उत्तम असून त्याची व्याप्ती ही वाढली पाहिजे. राज्यातील स्त्री शक्ती निश्चितच एकवटली जावी, अशी अपेक्षा चंपावती पत्रने व्यक्त करत उपक्रमाचे अग्रलेख लिहून स्वागत केले आहे. या उपक्रमामुळे  बीड शहरामध्ये प्रथमच महिला माेठ्या संख्येने रात्रीच्या वेळी बाहेर पडल्या. या रातरागिणी रॅलीचे जाेरदार स्वागत बीडकरांनी केले. 

स्थानिक दैनिकांना सहभागी करून घ्यावे...
दैनिकांची स्पर्धा असतेच, मात्र सामाजिक उपक्रमात दैनिकांनी सहभागी हाेणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानता असावी, ती नांदावी यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून दैनिकांची भूमिका महत्त्वाची आहे. आजही स्त्रीया अन्यायग्रस्त आहेत. त्यांची बाजू मांडण्यासाठी दैनिक दिव्य मराठीचा रातरागिणी उपक्रम हा अभिनंदनास पात्र आहे. हा उपक्रम गावागावांत पाेहोचणे आणि दर सहा महिन्याला हाेण्यासाठी व्याप्ती मिळणे गरजेचे आहे. त्या त्या िठकाणी स्थानिक दैनिकांना सहभागी करून घेण्याचाही विचार याेग्य ठरेल. - नामदेवराव क्षीरसागर, संपादक, दैनिक चंपावती पत्र

सकारात्मक राहणे गरजेचे
समाजातील परिस्थितीचे िचत्रण दैनिकांमधून हाेते. दैनिकांना ते करावेही लागतेच. त्यातही सकारात्मक दृष्टिकाेन पत्रकारांनी बातमी, उपक्रमांतून व्यक्त केल्यास सामाजिकता रुजेल व टिकेलही. स्त्री-पुरुष समानता असाे की अन्य सामाजिक उपक्रमात दैनिकांनी व्यावसायिकता बाजूला ठेवून सकारात्मकतेत एकत्र आल्यास नवीन चेतना निर्माण हाेईल. - सुभाष चाैरे, कार्यकारी संपादक, दैनिक चंपावती पत्र

बातम्या आणखी आहेत...